Home नाशिक नाशिकमधील नामांकित महाविद्यालयाची शिपायाकडून फसवणूक; लाखोंची हेराफेरी

नाशिकमधील नामांकित महाविद्यालयाची शिपायाकडून फसवणूक; लाखोंची हेराफेरी

135

आशाताई बच्छाव

1000531665.jpg

नाशिकमधील नामांकित महाविद्यालयाची शिपायाकडून फसवणूक; लाखोंची हेराफेरी

नाशिक : प्रतिनिधी

मागील काही महिन्यांत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना समोर येत असून, यातच आता नाशिक शहरातील एका नामांकित महाविद्यालयातून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या शिपायाने विद्यार्थी आणि पालकांना महाविद्यालया एवजी स्वतःच्या बँक खात्याचा तपशील देऊन शैक्षणिक फीची रक्कम ही स्वतःच्या खात्यात जमा करून घेत लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नेमकं प्रकरण काय..?

नाशिकमधील नामांकित भोंसला मिलिटरी स्कूल येथे हा प्रकार घडला असून, येथील विलास भास्कर आहेर नामक शिपायाने मे 2023 ते डिसेंबर 2023 या काळात महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू असताना स्वतःचे बँक खाते महाविद्यालयाचे असल्याचे सांगत व महाविद्यालयाच्या बँक खात्याएवजी स्वतःच्या बँक खात्याचा नंबर देत तब्बल 44 लाख 8 हजारांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित शिपायाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

असा झाला फसवणुकीचा उलगडा

महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांची फी जमा न झाल्याने प्रशासनाने त्यांना फी जमा करण्यास सांगितले असता त्यांनी ऑनलाइन माध्यमातून फी जमा केल्याचे सांगितले. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तपास केला असता, लेखा परीक्षणामध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महाविद्यालयाच्या व्यवस्थापने तातडीने गंगापूर पोलीस ठाणे गाठत शिपायाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस सविस्तर तपास करत आहेत.

Previous articleसरकारी रास्त भाव दुकानदारांची परिस्थिती तळ्यात मळ्यात? दुकान सरकारी की खाजगी?
Next article‘दि देवळा मर्चेंट्स को. ऑपरेटिव्ह’ बँकेची लाखोंची फसवणूक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.