Home जालना अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या मराठवाड्याच्या विभागीय अध्यक्ष पदी गोकुळसिंग राजपूत.

अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या मराठवाड्याच्या विभागीय अध्यक्ष पदी गोकुळसिंग राजपूत.

32
0

आशाताई बच्छाव

1000529089.jpg

अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या मराठवाड्याच्या विभागीय अध्यक्ष पदी गोकुळसिंग राजपूत.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 07/07/2024
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा विदर्भ -मराठवाडा विभागीय मेळावा संपन्न झाला आहे.
या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा हे प्रामुख्याने हजर होते. मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व नागरिकांना संबोधित करतांना राष्ट्रीय अध्यक्षांनी राज्यसह देशात सर्वच क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला असून सामान्य जनतेला जगणं कठीण झालेलं असल्याच त्यांनी सांगितल. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, संपूर्ण देशभरामध्ये अवैध धंदे व अवैध देशी दारूची विक्री जोरात सुरू असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी संघर्ष समितीने पुढाकार घेऊन अशा अवैध धंद्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.आपल्यातलेच काही फितूर त्यांना सहकार्य करीत असून आपल्याच लोकांची पिळवणूक करत असल्याचा खेद त्यांनी यावेळी व्यक्त केला. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर कार्यरत आहे .भारत सरकार प्रमाणित ही संघटना असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये संघटनेचे पदाधिकारी कार्यरत आहेत. देशात काण्या- कोपऱ्यात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कार्य जोमाने सुरू असून भ्रष्टाचाराचे विरोधात लढणारी ही एकमेव राष्ट्रीय संघटना आज कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री पंडितराव तिडके,प्रदेशकार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री वसंतराव देशमुख ,मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री शंकररावजी देशमुख ,अमरावती विभागीय कार्याध्यक्ष श्री किरण लहाने यासोबतच छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जगताप, जालना जिल्हा अध्यक्ष श्री कृष्णा लहाने, जालना जिल्हा सचिव श्री मुरलीधर डहाके, जाफराबाद तालुका अध्यक्ष श्री रामदास कदम, भोकरदन तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, भोकरदन तालुका विभागीय अधक्ष्य विनोद जगताप पाटील, सिल्लोड तालुका आधक्ष्य गजानन काळे,भोकरदन तालुका उपाध्यक्ष श्री सुनील उंबरकर, जालना जिल्हा उपाध्यक्ष श्री शालिक्राम आहेर, श्री डिगांबरराव जाधव भोकरदन,जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव तौर, लहान जिल्हाध्यक्ष श्री देवेंद्र मिसाळ, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख श्री अंकुश डहाके , यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.यावेळी संघटनेच्या माध्यमातून अनेक सतत कार्यरत व संघटनेच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे गोकुळसिंग राजपूत यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळसिंग राजपूत यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागिय अध्यक्ष पदावर निवड केली व तसे नियुक्ती पत्र त्यांना या मेळाव्यात देण्यात आले.व त्यांना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले आणि वाटचालीच्या शुभेच्छा राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांनी दिल्या याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर प्रदिप जगताप पाटील, सोयगाव तालुका उपाध्यक्ष सुनील चोरमारे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप मोरे, जिल्हा संघटक जब्बार डी तडवी, शंकर भामेरे पहूर,
राष्ट्रीय अध्यक्षांनी योग्य व्यक्तीच्या खांद्यावर संघटनेची धुरा दिली असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here