Home जालना माहोरा येथिल अनिस पठाण ठेकेदार यांची आखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीच्या...

माहोरा येथिल अनिस पठाण ठेकेदार यांची आखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हा संघटक पदी निवड

209

आशाताई बच्छाव

1000524062.jpg

माहोरा येथिल अनिस पठाण ठेकेदार यांची आखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हा संघटक पदी निवड
माहोरा जालना प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक 06/07/2024
सविस्तर वृत्त असे की, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे 3 जुलै रोजी झालेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महामेळावा पार पडला. मेळाव्यामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप बाबा खंडापूरकर उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतरावजी देशमुख, राष्ट्रीय संघटक श्री अरुण देशमुख,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री पंडितरावजी तिडके तसेच छ. संभाजी नगर चे सर्व पदाधिकारी, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातून बरेच पदाधिकारी उपस्थित होते. बाबांच्या अध्यक्षतेखाली अनीस पठाण ठेकेदार यांची आखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीच्या जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतरावजी देशमुख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री पंडितरावजी तिडके तसेच गणीभाई यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . त्यांच्या निवडी मुळे त्यांच्यावर जाफराबाद तालुक्यातून व भोकरदन तालुक्यांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांची निवड
Next articleआर्मी सैनिक, साकोली तहसिलचे सुपुत्र नितीन खेडीकर यांना शासकीय इतमातात सलामी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.