Home बुलढाणा ग्रामपंचायत सचिवांचा भोंगळ कारभार,घरकुला संदर्भात तक्रार करूनही ग्रामपंचायत सचिव व गट विकास...

ग्रामपंचायत सचिवांचा भोंगळ कारभार,घरकुला संदर्भात तक्रार करूनही ग्रामपंचायत सचिव व गट विकास अधिकारी दखल घेईणा, पळसखेड दौलत येथील प्रकार…

158

आशाताई बच्छाव

1000522402.jpg

ग्रामपंचायत सचिवांचा भोंगळ कारभार,घरकुला संदर्भात तक्रार करूनही ग्रामपंचायत सचिव व गट विकास अधिकारी दखल घेईणा, पळसखेड दौलत येथील प्रकार…
युवा मराठा न्यू संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली :- बुलढाणा चिखली तालुक्यातील मौजे पळसखेड दौलत येथील एका व्यक्तीने अतिक्रमण मध्ये चाललेल्या घरकुल बांधकामाची तक्रार ही ग्रामपंचायत सचिव यांच्या कडे दिली सदर काम हे घरकुलाचे आहे व हे काम अतिक्रमण मध्ये येत आहे ही तक्रार देवुन सुद्धा सचिव दुर्लक्ष करत आहे.
सदर अतिक्रमण मधील घरकुल बांधकाम चालू दिले सदर व्यक्तीने पुन्हा पंचायत समिती चिखली येथे तक्रार व विनंती अर्ज सादर केला अर्जामध्ये उल्लेख असा आहे
लाभार्थ्यांचा नमुना आठ अ वाढला कसा घराला दोन्ही बाजूला रस्ता आहे रस्त्यावर पासून ३ जणांचा भाव हिस्सा असलेला आठ अ हा लांबी ला ४२ इतका आहे खाली हाच शेवटचा जागेची आठ अ ५० कसा झाला आणि मला माझा रस्ता मिळावा ही विनंती केली असता
पंचायत समिती मधून कुठलाही कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा केलेला नाही सदर व्यक्तीने पुन्हा त्याचे बांधकाम सुरू केले आहे पंचायत समिती तथा ग्रामसचिव यांना अर्ज देऊन काही होत नाही तसेही पंचायत समिती चिखली येथील बिडिओ हे प्रभारी असल्यामुळे येथील कर्मचाऱ्याला त्यांच्या कामात पारदर्शकता राहिली नाही
अर्जदाराने प्रसारमाध्यमाशी संपर्क साधून सांगितले की मी वारंवार ग्रामपंचायत सचिव यांना तोंडी सांगून अथवा तक्रार वजा विनंती अर्ज करून मी दिलेल्या अर्जाचे माझे कोणत्याही प्रकारचे समाधान झाले नाही किंवा पंचायत समितीचे कुठलेही कर्मचारी घटनास्थळी आले नाही सदर व्यक्तीने जागा बांधणे एक आठवडाभर बंद ठेवून रस्त्यामध्ये परत चालू केली आहे मी सचिव यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी माझा फोन घेतला नाही व पंचायत समितीकडून मला कोणत्याही प्रकारचा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही उलट अतिक्रमण मध्ये घर बांधणाऱ्या व्यक्तीला पंचायत समितीकडून बांधण्यासाठी माझ्या मते पाठिंबा देण्यात येत आहे
तरी मी पंचायत समितीला स्मरणपत्र देऊन जिल्हा परिषद कडे सचिव अथवा स्थानिक चिखलीतील विस्तार अधिकारी यांची तक्रार करणार आहे.

पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सुटत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक हे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्या बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीमध्ये वाढता भ्रष्टाचार व नागरिकांच्या समस्या कडे लक्ष द्यावे.

Previous articleभरधाव एस.टी.बस ने दुचाकी चालकाला चिरडले.
Next articleलाडकी बहीण योजनेबाबत ‘या’ अफवा; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.