Home Breaking News जळगांव जामोद सह बहुजन मुक्त्ति पार्टी संपूर्ण ताकादीने लढविणार बुलढाणा जिल्ह्यातील सातही...

जळगांव जामोद सह बहुजन मुक्त्ति पार्टी संपूर्ण ताकादीने लढविणार बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा- श्रीकांत होवाळ

65
0

Yuva maratha news

1000503912.jpg

जळगांव जामोद सह बहुजन मुक्त्ति पार्टी संपूर्ण ताकादीने लढविणार बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा- श्रीकांत होवाळ
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा चीफ
बुलढाणा :-आज बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन मुक्ती पार्टीची कार्यकर्ता बैठक बोलावण्यात आली होती.ही बैठक बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशध्यक्ष अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार्टीची जिल्हा स्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला जिल्हयातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पार्टीचे संघटन वाढ विस्तार व उत्कृष्ट पद्धतीने रस्त्यावरची आंदोलनं यशस्वी केलीत त्यामुळे जिल्हयातील सातही ( बुलढाणा, मलकापूर, जळगांव जामोद, खामगाव, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा) विधानसभा निवडणुक संपूर्ण ताकतदिने लढवणार असल्याची माहिती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ यांनी मार्गदर्शन करतांना स्पष्ट केले व संपूर्ण ताकदिने कामाला लागा असे आदेश सुध्दा यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आले.
या देशातील शासक वर्गाने स्वातंत्र्याचे ७६ वर्षा नंतर सुध्दा अठरा पगड जातींच्या लोकांच्या समस्या सोडविल्या नाहीत. म्हणूनच बहुजन मुक्ती पार्टी मैदानात उतरली आहे असे प्रतिपादन पार्टीचे प्रदेश प्रभारी प्रताप पाटील यांनी केले.यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश महासचिव सुजित बांगर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एजाज शहा भारत मुक्ती मोर्चाचे विभागीय अध्यक्ष भागवत जाधव पिछडा (ओबीसी) वर्ग मोर्चाचे गोपाल वाघमारे बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या विदर्भ कोषाध्यक्ष संध्या हिवाळे , प्रकाश धुरंधर, महेंद्र गवई, इम्रान खान, प्रवीण गवई, अंकित भारसाकडे, जया उजागरे, लता खिल्लारे, रत्नाताई इंगळे, प्रीतीताई धुरंधर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्यातील कार्यकर्तेही या बैठकीस उपस्थित होते

Previous articleवृध्द कलावंतांच्या मानधन मंजुरीच्या याद्या अडकल्या लालफितशाहीत
Next articleविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निर्देशावरून राज्य सरकारची कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here