Home जालना पाच कोटी रुपयासाठी ( १३) वर्षे पीडित अपहरण झालेल्या शाळकरी मुलाची आठ...

पाच कोटी रुपयासाठी ( १३) वर्षे पीडित अपहरण झालेल्या शाळकरी मुलाची आठ तासात सुटका तीन अपहरण कर्त्यांना स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे सदर बाजार जालना कडून अटक

193
0

आशाताई बच्छाव

1000498405.jpg

पाच कोटी रुपयासाठी ( १३) वर्षे पीडित अपहरण झालेल्या शाळकरी मुलाची आठ तासात सुटका तीन अपहरण कर्त्यांना स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे सदर बाजार जालना कडून अटक
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 26/06/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 25/ 6/ 2024 रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान फिर्यादी नामे कृष्णा गोपीनाथराव मुजमुले वय 38 वर्षे व्यवसाय व्यापार राहणार पुष्कर हॉस्पिटल समोर अमर छाया टॉकीजवळ नवीन जालना यांचा 13 वर्षीय मुलगा त्यांचे राहते घरातून सायकलवर नारायणा ई टेक्नो या शाळेत निघून गेला. सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांचे मोबाईल फोनवर अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितली की, तुमचा मुलगा आमचे ताब्यात आहे. त्यास सुखरूप परत पाहिजे असल्यास संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान देवमूर्ती येथे पाच करोड रुपये घेऊन येऊन रक्कम देऊन मुलगा परत घेऊन जा काही हालचाल केली तर मुलास एड्स स्टेराईड्स चे इंजेक्शन देऊ अशी धमकी दिली होती. सदर बाब फिर्यादीने तात्काळ मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांना सांगितली मा. पोलीस अधीक्षक व मा अप्पर पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खानाळ यांना पाचरण करून सदर प्रकरणाबाबत माहिती देऊन मुलाचा शोध सूचना व मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार तसेच सदर बाजार जालना येथील पोलीस अधिकारी अमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपीकडील मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून पथकास योग्य सूचना व मार्गदर्शन करून पथकासह मुलाचा शोध कार्यकामी रवाना झाले. अपहरण झालेल्या मुलाचे वडीलास सोबत घेऊन आरोपी सोबत वेळोवेळी संभाषण चालू ठेवले. आरोपींनी वारंवार पाच कोटी, तीन कोटी अशी पैशाची मागणी करून रात्री आठ वाजता पैशाची बॅग कन्हैया नगर येथील रिलायन्स पेट्रोल पंप मागे ठेवण्यास सांगितले ठरल्याप्रमाणे पोलिसांनी सदर ठिकाणी व परिसरात सापळा लावून पैसे घेऊन जाण्यासाठी घेऊन आलेला आरोपी नामे रोहित राजा भुरेवाल राहणार पुष्कर हॉस्पिटल समोर जालना यास सीताफिने पकडले. त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करून इतर दोन आरोपीं अरबाज अकबर शेख रा. उडपी हॉटेल जवळ टांगा स्टॅन्ड जालना व वरूण नितीन शर्मा राहणार गायत्री नगर नवीन जालना अशा तीन आरोपींना बारीबारीने वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील ओमनी गाडीतील अपहरण झालेला तेरा वर्षीय मुलगा सुखरूप ताब्यात घेतला. नमूद त्यांनी आरोपीकडून एक ओमनी कार एक अपाची मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध फिर्यादी यांनी पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे फिर्याद दिल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा रजी. नंबर 716/ 2024 कलम 370, 363, 364, 364, 120 ( ब) 323, 506, 34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरोडे पोलीस ठाणे सदर बाजार हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ सदर बाजार पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सहा.पो.नि. श्री शांतीलाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक नरवडे, पोहेकाॅ फुलचंद हजारे, विनायक कोकणे, कृष्णा तंगे ,विजय डिक्कर,प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, गोपाल कौशिक, सतीश श्रीवास, योगेश सहानी, धीरज भोसले, शेख अजीम,चापोउपनि संजय राऊत यांनी केली आहे.

Previous articleशेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजामध्येच राहणार भारतीय पुरातत्व विभागाने केले स्पष्ट….
Next articleराज्य माहिती आयोग छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे सेनगाव तहसीलदार तथा अपिलीय अधिकारी यांना आदेश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here