Home जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न जिल्हा वार्षिक योजनेतंर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत...

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न जिल्हा वार्षिक योजनेतंर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा

107

आशाताई बच्छाव

1000496121.jpg

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

जिल्हा वार्षिक योजनेतंर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा

– पालकमंत्री अतुल सावे

 

जालना, दि. 25 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ):-   जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता मंजूर झालेला निधी विविध विकास कामांवर वेळेत खर्च करावा. तसेच सन 2023-24 या वर्षातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवनात आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी श्री. सावे बोलत होते. बैठकीस  आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सूर्यवंशी आदींसह सर्व विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.

सन 2024-25 अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी 390 कोटी नियतव्यय  मंजूर करण्यात आला आहे. हा संपूर्ण निधी वेळेत खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रशासकीय मान्यता घेऊन विकास कामे जलदगतीने पूर्ण करावीत. निधी परत जाऊ देऊ नये, याची विभागप्रमुखांनी दक्षता घेण्याची सूचना करुन पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, सन 2023-24 या वर्षातील प्रलंबित कामेही गतीने पूर्ण करावीत. तसेच पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात यावे. शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू देऊ नये. बोगस बियाणे, खताबाबतच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कार्यवाई करावी.

Previous articleजिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न क्रीडा संकुलात विविध क्रीडा सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत
Next articleमतदार यादी मध्ये नावे नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून विशेष मोहीम  –  शेख महेमूद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.