Home पुणे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे_विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त...

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे_विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे

258

आशाताई बच्छाव

1000496061.jpg

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे_विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे

 

संजीव भांबोरे
पुणे _दिनांक २६ जून २०२४ रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त “सामाजिक न्याय दिन” साजरा करणेबाबत
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयान्वये दि. २६ जून २०२४ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर १९८७ मध्ये पारित केलेल्या ठरावानुसार हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्यायाचे महत्व सांगणे, व्यसनमुक्ती बाबत प्रबोधन करणे या अनुषंगाने जाणीव निर्माण करणे व माहिती देण्यासाठी बुधवार, २६ जून २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा, पुणे येथून श्री. शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा, पुणे पर्यंत विद्यार्थ्याची रॅली व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांस अभिवादन व पुष्पहार अर्पण असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

Previous articleमुखेड येथील संविधान रक्षक कृती समितीच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद !
Next articleमुलींचे मंजूर आयटीआय कार्यान्वित करण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवणार   आ.कैलास गोरंटयाल यांचा राज्य सरकारला इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.