Home बुलढाणा येत्या आठ दीवसात बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुख सुविधा द्या,अन्यथा ठीय्या आंदोलन...

येत्या आठ दीवसात बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुख सुविधा द्या,अन्यथा ठीय्या आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचा ईशारा,

110

आशाताई बच्छाव

1000495729.jpg

येत्या आठ दीवसात बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुख सुविधा द्या,अन्यथा ठीय्या आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचा ईशारा,
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बिबी बुलढाणा :- ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची तसेच गेल्या कित्येक महिन्यापासून बंद पडलेली रक्त लघवी तपासणीची मशीन तात्काळ नवीन उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा व जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,
बीबी येथील ग्रामीण रुग्णालय हे लोणार तालुक्यातील सर्वात मोठे 30 खाटांचे रुग्णालय आहे रुग्णालयामध्ये 3 अधिकारी कार्यरत असून त्यापैकी एक अधिकारी हे कॉन्ट्रॅक्ट बेस वर आहे तर दुसरे एक अधिकारी हे बीबी येथे कार्यरत असताना ते बीबी येथे उपस्थित न राहता खामगाव या ठिकाणी ड्युटी करतात तर उर्वरित एक महिला अधिकारी ह्या नेहमी सुट्टीवर असतात गेल्या काही महिन्या अगोदर या रुग्णालयापासून जवळच असलेल्या खापरखेड घुले सोमठाणा या गावांमध्ये भगरी मधून काही लोकांना विषबाधा झाली असता शेकडो विषबाधा झालेल्या लोकांना ग्रामीण रुग्णालय बीबी येथे आणले असता त्या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हता तर दुसरीकडे या रुग्णालयातील रक्त लघवी तपासणी मशीन ही गेल्या कित्येक महिन्यापासून बंद पडलेली आहे त्यामुळे रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना खाजगी लॅबमधून रक्त लघवी तपासून आणावी लागते त्यामुळे गोरगरीब रुग्णावर याचा फार मोठा भुर्दंड पडत आहे तरी येत्या 1,जुलै पर्यंत रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी व रक्त लघवी तपासणी मशीन उपलब्ध करून न दिल्यास रुग्णालयामध्ये बेमुदत ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा सहदेव लाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे निवेदनावर कार्तिक धाईत, आणिल लांडगे, ऋषिकेश धाईत ,भागवत मुळे, तुषार मुर्तडकर ,उद्धव आटोळे ,राम डुकरे, चेतन ढाकणे ,सागर मुर्तडकर, अजय कायंदे ,पांडुरंग कुलकर्णी ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleरस्त्याला नाल्या नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिरले पावसाचे पाणी…
Next articleमाहोरा गावासाठी १०० के.व्ही. चे १२ स्वतंत्र थ्री फेज रोहित्र मंजूर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.