Home बीड बीड जिल्ह्यातील किल्लेधारूरमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीनच चोरून नेली

बीड जिल्ह्यातील किल्लेधारूरमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीनच चोरून नेली

31
0

आशाताई बच्छाव

1000489153.jpg

बीड जिल्ह्यातील किल्लेधारूरमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीनच चोरून नेली

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/किल्लेधारूर दि: २२ जून २०२४ येथील तेलगाव रोडवरील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोट्याने पिकअप मध्ये टाकून चोरून नेहण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या दक्षतेमुळे सदरील एटीएम मशीन व पिकअप हस्तगत करण्यात यश आल्याचे समजते. खामगाव पंढरपूर महामार्गावर एसबीआय बँकेची शाखा असून, समोरच एटीएमही आहे. आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी पिकपच्या साह्याने एटीएम मशीन चोरून नेले यामध्ये २० लाखापेक्षा जास्त रोकड होती. एटीएम चोरी झाल्याचा प्रकार बँकेच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात पोलिसांनी चोरीसाठी वापरलेला पिकअप गेलेल्या दिशेने पाठलाग सुरू केला. सदरील पिकअप माजलगाव तालुक्यातील जायकवाडी परिसरातून ताब्यात घेतला. तसेच त्याच परिसरात शोधाशोध करून एटीएम मशीनही मिळून आली. चोरट्यांना मशीन काही फुटले नसल्याने आतील रोकड सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या प्रकरणाचा लवकरच छडा लावण्यात यश मिळेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. पोलीस आणि बँक कर्मचाऱ्यांच्या जागरूकतेमुळे मोठे नुकसान टळले आहे. परंतु मागील काही दिवसापासून धारूर शहर आणि पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या घटना वाढल्या असून याकडे पोलिसांनी लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्याने याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. सोडलेले एटीएम मशीन घेऊन जाण्यासाठी औरंगाबाद/ संभाजीनगर येथून पिकअपही चोरून आणल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे एटीएम मशीन चोरणारी टोळी सराईत दिसत असून, याचा शोध लागला तर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here