Home बीड पंकजाताई मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार !

पंकजाताई मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार !

40
0

आशाताई बच्छाव

1000486095.jpg

पंकजाताई मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार !

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि:२१ जून २०२४ भाजपाच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून कळाली असून प्रदेश भाजप आणि केंद्रीय भाजप कार्यकरणीच्या वतीने पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय कार्यकारणी समितीच्या वतीने राज्यात अनेक निर्णय धडाधड घेण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या अपयशानंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून पंकजा मुंडे यांची आता राज्यसभेवर वर्णी लावण्यात येणार आहे. ओबीसी चेहरा म्हणून तसेच मास लीडर म्हणून पंकजा मुंडे यांची राज्यात प्रतिमा असून या प्रतिमेचा फायदा विधानसभा निवडणुकीत पक्षाला होईल असा सूर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतून निघाला असून यावरून पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे.

Previous articleअमरावती ग्रामीण ची भरती रद्द नव्हे, पावसामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलली!
Next articleतरुणाचा गळा आवरून खून: आत्महत्या दर्शविण्यासाठी मृतदेह रेल्वे मार्ग टाकला, ब्लॅंकेट मध्ये आढळला मृतदेह.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here