आशाताई बच्छाव
सोनुने कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम वटपौर्णिमेच्या निमित्ताने सरस्वती विद्यालयात पुस्तकांच वाटप.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 21/06/2024
आज दिनांक 21/06/2024 वटपौर्णिमा, वटपौर्णिमेच्या निमित्ताने सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोंदेगाव ता.जी.जालना या विद्यालयाला श्री विष्णू सोनुने परिवारातर्फे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित पस्तकांचे वाटप करण्यात आले.
जुन्या भाकडकथा व अंधश्रद्धा तसेच परंपरागत रुढी व परंपरा यांना फाटा देऊन वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून धागा बांधल्यापेक्षा सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली केली त्यांचा आदर्श घेऊन समाज जागृती करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवित असल्याचे प्रतिपादन सौ.रंगोली सोनुने यांनी यावेळी बोलतांना सांगितले.यापुढे असे अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन विष्णू सोनुने यांनी केले आहे.यावेळी श्री विष्णू सोनुने, सौ.अंजली सोनुने,श्री अभिलाष सोनुने,सौ.रंगोली सोनुने, तुषार जऱ्हाड, तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री सचिन देशमुख सर, श्री पी.बी.बांडगे, श्री व्ही.एस.दळवी, श्री के.व्ही.नवल, श्री आर.आर.वायाळ, श्री एस.ए.आमले, श्री डि.ए.वाघ, श्री एस. एम.शेळके, श्री व्ही.टी.बोर्डे, श्री आर.ए.साबळे, श्री व्हि.पी.देशमुख, श्री एस.डी.दांडगे, श्री एन.बी.कनखर, श्री एस.ए.दांडगे, श्री एस.पी.शिंदे, श्री जी.एन.डोंगरे, श्री शिवाजी मुळे, श्रीमती रंजना देशमुख मॅडम, श्रीमती शितल मगर मॅडम, श्री पी.जी.पाटील,श्री भारत गळगउंडए, श्री एस.जी.पवार यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते