
आशाताई बच्छाव
डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री यांना निवेदन
नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवरील वाहन तळाचे काम त्वरित थांबवा व मुंबईतील पपई जय भीम नगरातील बौद्ध बांधवांच्या उध्वस्त केलेल्या घरांकरता पाच एकर जागा बांधकामा त्वरित उपलब्ध करून द्या
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)- आज दिनांक 20 जून 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले .देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवरील तयार होत असलेल्या वाहन तळाचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे .त्याचप्रमाणे मुंबई येथील पपई जय भीम नगरातील नं
अंदाजे 600 बौद्ध बांधवांच्या उध्वस्त केलेल्या घराकरता पाच एकर जागा घर बांधकाम करण्याकरता त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे याकरिता निवेदन देण्यात आले. सविस्तर माहिती असे की ड बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर 1956 पाच लाख अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्याकरता नागवंशीय लोकांची भूमी म्हणून संपूर्ण भारतीयांकरता नागपूर नगरी धम्मदीक्षाकरिता ठरविली व हिंदू धर्माचे त्याग करून स्वतः बौद्ध धर्म स्वीकारून इत अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली .तेव्हापासून नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी आम्हा बुद्ध उपासकांना व उपाशीकांना प्रेरणा व श्रद्धास्थान अशा पवित्र दीक्षाभूमीचे समाजकार्य करून दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांचा संगनमताने विपुद्रीकरण करण्याकरिता वाहन तळाची आवश्यकता नसतानाही वाहन स्थळ पवित्र दीक्षाभूमीवर तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या वहन तळाच्या बांधकामाला त्वरित बंद करण्यात यावे. त्याचप्रमाणे मुंबई येथील पपई भागातील जय भीम नगरामध्ये अंदाजे 30 वर्षापासून बौद्ध बांधव घर बांधून राहतात. त्यांचे घर टॅक्स सुद्धा
घेतले जात आहे निवडणुकीच्या यादीमध्ये नावे सुद्धा आहेत अशा गरीब कष्टकरी बौद्ध बांधवांचे हिरानंदानी नावाच्या बिल्डरने व मुंबई महानगरपालिका यांच्यासोबत संगमत करून त्यांचे घर बुलडोजर लावून पाडल्या गेले, ऐन पावसाळ्याच्या ऋतूमध्ये त्यांचे संसार उघड्यावर आले. त्यांचे पुनर्वसन करण्याकरता त्यांना घर बांधकामाकरिता पाच एकर भूखंड सर्वांच्या नावे त्वरित करून द्यावे. अन्यथा न्याय न मिळाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य येथील कार्यकर्ते आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 27 जुलै 2024 ला पावसाळी अधिवेशन कालावधीमध्ये भीक मांगो आंदोलन करण्यात येईल . ते सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. निवेदन देतेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सदानंद धारगावे, नम्रता बागडे उपाध्यक्ष डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना,अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय संजीव भांबोरे , महाराष्ट्र शासन समाजभूषण पत्रकार डी जी रंगारी ,स्नेहा साखरवाडे विदर्भ महिला अध्यक्ष ,मनीषा विदभांडारकर विदर्भ महिला कार्याध्यक्ष भंडारा जिल्हाध्यक्ष अलका मेश्राम ,मोरेसर गजभिये ,चंद्रशेखर खोब्रागडे, अशोक मेश्राम ,सत्यवान मेश्राम, विलास मेश्राम, रागिनी दुबे, कीर्ती भांडारकर, रोशनी निखुडे, रंजू जनबंधू, नलू वानखेडे,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .