Home जालना पराभवाला खचून न जाता आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा” माजी मंत्री रावसाहेब...

पराभवाला खचून न जाता आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा” माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवेंचे संघटनात्मक बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन

23
0

आशाताई बच्छाव

1000476449.jpg

 

 

“पराभवाला खचून न जाता आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा”

माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवेंचे संघटनात्मक बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ)  पंचवीस वर्षे माझ्या जनतेने मला साथ दिली. लोकशाहीत विजय, पराजय हा निवडणुकीचा एक भाग असून पराभव विसरून आता आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. सोमवारी शहरातील भारती लॉन्समध्ये भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक आभार बैठक पार पडली. यावेळी दानवे म्हणाले की, गेली २५ वर्ष तुम्ही माझ्यामागे भक्कमपणे उभे होता, राजकारणामध्ये हार-जीत होत असते. पराजयाने खचून न जाता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा अशा सर्व निवडणुका ताकदीनिशी लढायच्या आहेत यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून सज्ज राहावे, मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे आवाहन करीत दानवेंनी जालना विधानसभेतील मतदारांचे आभार मानले.

यावेळी बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना महानगराध्यक्ष अशोक पांगारकर, जिल्हाउपाध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, राजेशजी राऊत, रामेश्वर भांदरगे, अर्जुन गेही, सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलिये, सोपान पेंढारकर, देविदास देशमुख, चंपालाल भगत, भागवत बावणे, कपिल दहेकर, वसंतराव शिंदे, कैलास उबाळे, पांडुरंग पोहेकर, संध्याताई देठे, विमलताई आगलावे, शुभांगीताई देशपांडे,सतीश जाधव, विजय कामड, शशिकांत घुगे, ज्ञानेश्वर ढोबळे, महेश निकम, सुनील पवार, राहुल इंगोले, योगेश लहाने, डॉ. श्रीमंत मिसाळ, सुधाकर खरात, रोशन चौधरी, सिद्धेश्वर हाजबे, नेमीचंद भुरेवाल, बाबासाहेब कोलते, मनोज बिडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here