Home नाशिक लोकसहभागातून चिराई गावात पाच हजार वृक्ष लागवडीचा मानस

लोकसहभागातून चिराई गावात पाच हजार वृक्ष लागवडीचा मानस

322
0

आशाताई बच्छाव

1000476417.jpg

लोकसहभागातून चिराई गावात पाच हजार वृक्ष लागवडीचा मानस

नामपूर,(वामन शिंदे प्रतिनिधी):- वृक्ष लागवड करणे सोपे आहे, मात्र त्यापेक्षा त्याची देखभाल करणे तितकेच आव्हानात्मक काम आहे. या पुढील काळात प्रत्येक नागरिकाने किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारून वृक्षरोपणास हातभार लावला पाहिजे. वृक्षारोपण ही केवळ एकट्या वनखात्याची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे, चिराई गावातील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा मानस चिराई चे सामाजिक कार्यकर्ते ऍड अशोक आहिरे यांचे आहे ते म्हणाले, भविष्यात पर्यावरणाचे स्वरूप काय असेल, किती भयानक परिस्थतीला आपणाला सामोरे जावे लागेल याचा अभ्यास करून त्यांनी वनीकरनाचा उपक्रम हाती घेतला आहे. समाजात गुटगुटीत निसर्ग फुलला पाहिजे यासाठी कुणा एकट्याचे प्रयत्न पुरेसे नसून त्यात सार्वजनिक पातळीवर एकजुटीने सामाजिक वृक्षारोपणाचा संदेश रुजायला हवा. याबरोबरच निसर्गाशी भांडण न करता त्याला सोबत घेऊन काम करण्याची गरज असून नागरिकांनी केवळ संकल्पावर विसंबून राहू नये. खरे तर दहा वर्षांपूर्वीच पर्यावरणाच्या जनजागृती बद्दल विविध पातळीवर प्रयत्न व्हायला हवे होते . मात्र ते न झाल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम हाती घ्यावा लागत आहे यावेळी वनविभागाचे अधिकारी सहाणे, सागर पाटील, वनरक्षक सोनवणे, जायखेडाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरोशतम शिरसाठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच वृक्ष लागवडीसाठी चिराई येथील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here