Home बीड केजचा तहसीलदार फरार ? तर कोतवाल अडकला एसीबीच्या जाळ्यात

केजचा तहसीलदार फरार ? तर कोतवाल अडकला एसीबीच्या जाळ्यात

132

आशाताई बच्छाव

1000421926.jpg

केजचा तहसीलदार फरार ? तर कोतवाल अडकला एसीबीच्या जाळ्यात

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/केज दि: ०१ जून २०२४ राशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच घेताना केजचा कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली असून सर्वत्र सोशल मीडियावर याची एकच चर्चा सुरू आहे. तसेच केसचा तहसीलदार अभिजीत पाटील हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे. अशी चर्चा शुक्रवार रात्री सर्वत्र सुरू होती. ही कारवाई उस्मानाबाद/धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री १०:०० वाजता केली अशी समजते. दरम्यान बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सुरूच आहे. एसीबीकडूनही कारवायांचा धडाका चालुच आहे. अभिजीत पाटील हा केजचा तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून पाटील यांच्यासाठी वसुलीचे काम करतो. केज तालुक्यातील एका राशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार पाटील यांनी २० हजार रुपयाची लाच मागितली होती? अशी माहिती मिळत आहे. हीच लाच कोतवाल माने यांनी स्वीकारली. परंतु तहसीलदार अभिजीत पाटील फरार झाल्याची चर्चा सुरू आहे. उस्मानाबाद धाराशिव येथील लाच लूजपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली असंच म्हणावं लागेल.

Previous articleपाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी अन् पदाधिकारी भर उन्हात तलावावर
Next articleजुगार अड्ड्यावर छापा, आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल ‘इतक्या’ हजारांचा ऐवज जप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.