Home बीड पत्नी मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाला सासरवाडीत जबर मारहाण

पत्नी मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाला सासरवाडीत जबर मारहाण

195

आशाताई बच्छाव

1000413448.jpg

पत्नी मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाला सासरवाडीत जबर मारहाण

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: २९  सासरी आलेल्या पत्नी मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाला मेहुणा, सासू आणि पत्नीने जबर मारहाण केल्याची घटना पांगरी कॅम्प येथे घडली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरी असलेल्या पत्नी व मुलांना भेटण्यासाठी दि. २७ सोमवार रोजी जावई भेटण्यासाठी गेला. यावेळी त्यांनी घराच्या दाराची कडी वाजवतात मेव्हण्याने माझ्या घराचे दार का वाजले म्हणून लोखंडी रॉडने डोक्यात मरून डोके फोडले. तर पत्नी आणि सासूने शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी यांनी मारहाण केली. यावेळी मेहुण्याने माझ्याकडे बंदुक असून गोळ्या घालून जाग्यावर ठार मारीन अशी धमकी दिली. या घडलेल्या प्रकरणाविषयी मोहन विष्णू गीत्ते वय ४१ यांनी फिर्यादी दाखल केली. यावरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मंगलबाई गंगाधर मुंडे, राजकुमार गंगाधर मुंडे, मित्तल मोहन गीत्ते या तिघा विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार केकान हे करीत आहेत. दरम्यान सासरी असलेल्या पत्नी मुलास भेटण्यासाठी जावयास मेव्हणा, सासू आणि पत्नीने मारहाण केल्याची घटना पांगरी कॅम्प येथे घडली आहे.

Previous articleमतमोजणीच्या पुर्वतयारीचा आढावा पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
Next articleपरळी नगरपरिषदच्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना वेग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.