Home वाशिम कुणाचे हातपाय मोडले, कुणाचे डोके फुटले किनखेडा ते सोयता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेचा...

कुणाचे हातपाय मोडले, कुणाचे डोके फुटले किनखेडा ते सोयता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेचा एल्गार

197
0

आशाताई बच्छाव

1000413197.jpg

कुणाचे हातपाय मोडले, कुणाचे डोके फुटले
किनखेडा ते सोयता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेचा एल्गार
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ )-तालुक्यातील ग्राम किनखेडा ते सोयता या ५ किलोमिटरच्या कच्च्या रस्त्याची भिषण दुर्दशा झाली असून गेल्या पाच वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. पावसाळ्याच्या आधी सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात व तालुका संघटक तथा किनखेड्याचे तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ खुपसे यांच्या नेतृत्वात बुधवार, २९ मे रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून देण्यात आला आहे.
निवेदनात नमुद आहे की, किनखेडा ते सोयता हा ५ किमी. चा कच्चा रस्ता वर्ष २०१८-१९ मध्ये तयार करण्यात आला होता. या रस्त्यावर वनविभागाची मालकी आहे. तसेच किनखेडा गावाला लागूनच थोडासा घाट रस्ता आहे. तेथेही वनविभागाची जमीन आहे. मात्र या रस्त्याच्या दुर्दशेमुळे शेतकर्‍यांना आपला माल घेवून जाता येत नाही. हा घाटरस्ता वनविभागाने होवू दिला नाही. खराब रस्त्यामुळे अनेक ग्रामस्थांचे हातपाय मोडले तर काहीजणांचे डोकेही फुटले. पुढे पावसाळ्यात तर या रस्त्यावरुन साधे चालताही येत नाही. त्यामुळे खरीप हंगामाची तयारी करणार्‍या शेतकरी व ग्रामस्थांचे हाल होत असून पावसाळ्यात वाहतूक व दळणवहन पुर्णपणे बंद होवू शकते. शेतकरी व ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेवून सदर रस्ता पावसाळ्याच्या आधी दुरुस्त करावा अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा खुपसे यांनी दिला आहे.

Previous articleरानावनात भटकंती करणाऱ्या पक्ष्यासाठी ओंजळभर पाणी ठेवणे गरजेचे – पक्षी मित्र विलास केजरकर
Next articleलग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार: फोटो व्हायरल ची धमकी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here