Home जालना जि. प. प्रशाला माहोरा शाळेच्या दहावीच्या निकालाची पंरंपरा कायम.

जि. प. प्रशाला माहोरा शाळेच्या दहावीच्या निकालाची पंरंपरा कायम.

307
0

आशाताई बच्छाव

1000410898.jpg

जि. प. प्रशाला माहोरा शाळेच्या दहावीच्या निकालाची पंरंपरा कायम. …
माहोरा प्रतिनिधी -मुरलीधर डहाके
दिनांक 28/05/2024
माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशालने आपली इयत्ता दहावीच्या निकालाची पंरंपरा कायम राखली असुन यावर्षीही या जि.प.प्रशालेचा निकाल 98.80 टक्के लागला असून त्यांनी निकालाची पंरंपरा कायम राखली आहे.
मार्च 2024 या वर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल दिनाक 27/05/2024 रोजी जाहीर झाला त्यामध्ये माहोरा जि.प.प्रशाला माहोरा शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 98.80 टक्के लावीत घवघवीत यश मिळाले.विशेष प्रावीण्यासह 145 विद्यार्थी पास झाले, प्रथम श्रेणीत 15 विद्यार्थी पास झाले, तर द्वितीय श्रेणी मिळवत 5 विद्यार्थी पास झाले. विशेष म्हणजे 13 विद्यार्थी 90%पेक्षा जास्त गुण घेऊन पास झाले 78 विद्यार्थ्यांनी 85%पेक्षा जास्त गुण मिळविले…. प्रथम क्रमांक… कु. नंदिनी नायबराव पवार 92.60%… द्वितीय क्रमांक … तुषार कैलास अवकाळे 91.60%…तृतीय क्रमांक.. कु. जागृती राजेंद्र सुसर 91.20%…अशा प्रकारे घवघवीत यश मिळत पास झाले. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद या सर्वांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा परीषद प्रशाला माहोरा शाळेचा निकाल चांगला लागल्यामुळे माहोरा व परिसरातून विद्यार्थ्यांचे व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे पालक वर्गातून अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here