Home नांदेड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाण्याची टाकी जवळ एकाचा खून

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाण्याची टाकी जवळ एकाचा खून

94

आशाताई बच्छाव

1000373131.jpg

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाण्याची टाकी जवळ एकाचा खून

नांदेड (विशेष प्रतिनिधी शिवाजी धुमाळे) – वजिराबाद पोलीस ठाण्यासमोरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात जुन्या भांडणाच्या वादातून तीन युवकांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. वजिराबाद पोलीसांनी अत्यंत त्वरीत कार्यवाही करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल दि.१३ मे च्या रात्री ११ वाजेच्या सुमारास वजिराबाद पोलीस ठाण्याच्यासमोरील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात हा खूनाचा घटनाक्रम घडला. या ठिकाणी अनेक जण दारु पिण्यासाठी बसतात, काही गरदुले तेथे वास्तव्य करतात काल झालेल्या घटनाक्रमात या मैदानात संदीप गंगाराम मेटकर वय ३५ वर्ष आणि इतर तीन जण सुनिल मेटकर,दिनेश मेटकर आणि लक्ष्मण पवार हे सर्व दारु पित बसलेले होते आणि त्यातच जुन्या भांडणाचा विषय निघाला आणि त्यानंतर सुनिल मेटकर, दिनेश मेटकर आणि लक्ष्मण पवारने संदीप गंगाराम मेटकरला लोखंडी रॉडने एवढी मारहाण केली की, त्याचा खून झाला. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आदित्य लोणीकर अधिक तपास करीत आहेत. वजिराबाद पोलीसांनी खून करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.

Previous articleधर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय ग्रुप तर्फे वृक्ष रोपन
Next articleभंडारा जिल्ह्यातील उन्हाळी परीक्षा 2024 च्या वेळापत्रकात बदल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.