आशाताई बच्छाव
श्रीरामपूर ,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष व श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक मल्लू मारुती शिंदे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारानिमित्त यशोधन कार्यालयात आज बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी मल्लू शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांच्या हस्ते श्री. शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी आ. कानडे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक सर्वश्री अंजुम शेख, राजेश अलघ, मुक्तार शहा, सलीम शेख, मोहम्मद शेख, कलीम कुरेशी, विजय शेळके, अशोक (नाना) कानडे तसेच नानासाहेब रेवाळे, रज्जाक पठाण, दीपक कदम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मल्लू शिंदे म्हणाले, आ. कानडे व आपली जुनी मैत्री आहे. आम्ही पूर्वीपासून पुरोगामी विचाराच्या चळवळीत काम करीत आहोत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहोत. भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष असून जनतेला फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारापासून दूर नेऊन डॉ. आंबेडकर यांचे संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने युती करून लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतला आहे. ते आपल्याला मान्य नाही. आ. कानडे यांनी श्रीरामपूर-राहुरी मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यांच्या विकास.कामाने प्रभावीत होऊन जातीयवादी पक्षासोबत न जाता आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने काम करावे.
आ. कानडे म्हणाले, सन ८० च्या काळात लक्ष्मण माने व आपण भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांचे जीवन समजून घेत असताना श्री. शिंदे व आपली ओळख झाली. त्यांच्या घरी आम्ही मुक्काम केला. तेव्हापासून आमची मैत्री आहे. मधल्या काळात ते काँग्रेस पासून दूर होते. आता त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद निश्चित वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सचिन गुजर, अरुण पाटील नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, अंजुम शेख यांनी मनोगतातून श्री, शिंदे यांच्या पक्ष,प्रवेशाच्या निर्णयाचे स्वागत केले, रज्जाक पठाण यांनी सूत्रसंचालन केले. दीपक कदम यांनी आभार मानले. यावेळी सरपंच सागर मुठे. अमोल आदिक. अजिंक्य उंडे. आशिष शिंदे. कल्पेश माने, रवी भांबारे, असलम सय्यद, इमरान शेख, आकाश शेंडे आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……