Home उतर महाराष्ट्र Breking news मांजर काढणाऱ्या मुलास बाहेर काढताना विहिरीतील गाळात रुतून ५ जणांचा...

Breking news मांजर काढणाऱ्या मुलास बाहेर काढताना विहिरीतील गाळात रुतून ५ जणांचा गुदमरून मृत्यू

221
0

आशाताई बच्छाव

1000272616.jpg

नेवासा,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी): मांजर काढणाऱ्या मुलास बाहेर काढताना विहिरीतील गाळात रुतून ५ जणांचा गुदमरून मृत्यू

विहिरीत पलंग टाकून रात्री उशिरापर्यंत मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

जनावरांचे मलमूत्र, केर, कचरा व शेण जमवलेल्या जुनाट विहिरीत पडलेले मांजर काढण्यासाठी गेलेल्या मुलाला वर काढण्यासाठी त्याच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा विहिरीतील विषारी वायुमुळे बेशुद्ध पडून गाळात रुतून मृत्यू झाला. या दुर्घटनेतील गंभीर जखमी झालेल्या एकास नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नेवासे तालुक्यातील वाकडी येथे घडली. विशाल ऊर्फ बबलू अनिल काळे (वय २३), अनिल बापूराव काळे (वय ५८), बाबासाहेब पवार (वय ३५), संदीप माणिक काळे (वय ३६) माणिकराव गोविंदराव नंतर
काळे (वय ६५) अशी मृतांची नावे आहेत. वाकडी शिवारातील अनिल डटले बापूराव काळे यांच्या शेतावर असलेल्या मीण जुनाट विहिरीत जनावरांचे मलमूत्र त्तम व शेण साठवलेले होते. या विहिरीत मध्ये पडलेले मांजर काढायला विशाल ऊर्फ ती. बबलू अनिल काळे (वय २३) गेला. हे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल चे बापूराव काळे (वय ५८) विहिरीत ते उतरले, पण तेही वर आलेच नाही. हे की पाहून शेजारच्याच शेतातील बाबासाहेब ना पवार (वय ३५) हा त्यांना काढायला खाली गेला तो सुद्धा आतमध्येच गेला. न दरम्यान, अनिलचा चुलत भाऊ संदीप माणिक काळे (वय ३६) हे रस्त्याने • जात होते त्यांना आवाज दिल्यानंतर ते देखील विहिरीत उतरले. बराच वेळ तेही वर आलेच नाहीत हे पाहून त्यांचे वडील माणिकराव गोविंदराव काळे (वय ६५) विहिरीत उतरले आणि तेही बेशुद्ध होऊन गाळातच रुतले. दरम्यान, अजय माणिक काळे (वय ३६) हा कमरेला

दोर लावून विहिरीत उतरला. त्याला दम लागल्याने त्याने आवाज देताच लोकांनी त्याला वर काढले. त्याला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर, श्रीरामपूर व छत्रपती संभाजीनगर येथून मदत कार्यासाठी टीम बोलावण्यात आल्या. रात्री आठपर्यंत या टीम पोहोचल्यानंतर पाच मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रात्री ९.३० वाजेपर्यंत मदतकार्य सुरूच होते. दरम्यान, काळे कुटुंबात अजय माणिक काळे हा एकमेव पुरुष जिवंत आहे. सुदैवाने वाचलेला अजय काळे याला उपचारासाठी नेवासे फाटा येथे व नंतर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गाई, म्हशींचे गोमूत्र व शेण साठवण्यात आलेल्या विहिरीमध्ये विषारी वायू तयार झालेला होता. विहिरीत प्रत्येक जण उतरलेला प्रथम बेशुद्ध पडून नंतर त्या गाळात रुतून त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here