आशाताई बच्छाव
फॅन्टसी किडस् झोन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन
जालना, (प्रतिनिधी दिलीप बोंडे)- जुना जालना भागातील पाठक कॉप्लेक्समधील फॅन्टसी किडस् झोन शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजीचे प्राथमिक धडे दिले जातात. असे असले तरी या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जपण्यासाठी केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाचे करावे तेवढे कौतुक कमी ठरेल. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्याकडून तयारी करून घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी घेतलेले परिश्रम महत्त्वाचे ठरतात, असे मार्गदर्शन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रसना देहेडकर यांनी केले.
येथील ब्राह्मण सभेच्या सभागृहात हे स्नेह संमेलन पार पडले. संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून रसना देहेडकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, ज्येष्ठ समाजसेवक रमेश देहेडकर, से.नि. अभियंता एस.एन.कुलकर्णी, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बलवंत नाईक, शाळेच्या संस्थापिक छाया बलवंत नाईक, सौ. संध्या पंडित, ॲड. दिपक नाईक, पुनम नाईक, लक्ष्मीकांत नाईक, संगीता नाईक, ॲड. सुनील नाईक, विद्या नाईक यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी
रमेश देहेडकर, कल्याणराव देशपांडे, ॲड. बलवंत नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या चौफेर प्रगतीसाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका अल्पना पुरी, ज्योती अग्निहोत्री, योगीता शिराळकर, प्रियंका बिडवे, रेखा राऊत यांच्यासह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील बालचिमुकल्यानी विविध प्रकारचे आपली संस्कृती कला गुण सादरीकरण केल्याने उपस्थितिताचे मने जिंकली.