आशाताई बच्छाव
जालना जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 16 वर्षाखालील क्रिकेट खेळाडुंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी
जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे– जालना जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी नूकतीच पार पडली आहे. या चाचणीसाठी जालनासह बुलढाणा, परभणी जिल्ह्यातील खेळाडूंनीही सहभाग नोंदवला होता. यावेळी जालना जिल्हा क्रिकेड असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र देशपांडे, राजू काणे, अभिजीत चव्हाण यांची उपस्थिती होती.
ही निवड चाचणी साई काणे अॅस्ट्रो टर्फ एमआरडीए शाळेजवळ रोहणवाडी रोड येथे घेण्यात आली.
क्रिकेटमध्ये खेळाडूंसाठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया राजू काणे यांनी यावेळी पालकांशी संवाद साधतांना व्यक्त केली. श्री काणे म्हणाल की, जालना क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनी राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर खेळून जालनाचे नावलौकीक केलेले आहे. विजय झोल सारख्या खेळाडूने तर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. निवड चाचणीची पद्धत योग्य आहे की कसे याबाबत पालकांच्या काही सूचना असल्यास संघटनेला कळवाव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी पालकांना केले. यावर खेळाडूंच्या पालकांनी जालना जिल्हा क्रिकेट संघटनेचे आभार व्यक्त करत ज्या पद्धतीने या ठिकाणी खेळाडूंची निवड होत आहे ते पाहता राज्यात इतर ठिकाणी अशा पद्धतीने निवड झाल्याचे पाहिले नसल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. सुरुवातील फास्ट गोलंदाज, स्पीनर गोलंदाज आणि मशिन द्वारे बॉल टाकून फलंदाजांची चाचणी करण्यात येत होती. त्यांना त्यांच्या प्रदर्शनासाठी योग्य अवधी देण्यात येत होता. गोलंदाजांच्या चाचणी करतांना त्यांनाही योग्य अवधी देण्यात आल्याने अनेक पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
जालना, परभणी, बुलढाणा आदी जिल्ह्यातील खेळाडूंनी या निवड चाचणी