Home जालना जाफराबाद- चिखली रोडवरील अपघातात युवकाचा मृत्यू, पत्नी व मुलगा गंभीर जखमी

जाफराबाद- चिखली रोडवरील अपघातात युवकाचा मृत्यू, पत्नी व मुलगा गंभीर जखमी

189
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_175111.jpg

जाफराबाद- चिखली रोडवरील अपघातात युवकाचा मृत्यू, पत्नी व मुलगा गंभीर जखमी
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 21/03/2024
साविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा येथील सामान्य कुटुंबातील यूवक साईनाथ सुरेश धायडे हे वरूडहून आपल्यागावी सिपोरा अंभोरा येथे जात असताना दि.19 मार्च रोजी रात्री नऊ ते दहा च्या दरम्यान जाफराबाद चिखली रोडवर सोनगीरी फाट्याजवळ अपघात होऊन साईनाथ हे ठार झाले आहेत. तसेच त्यांच्या सोबत असलेली त्यांची पत्नी व मुलगा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पीटल मध्ये हलविण्यात आले आहे.सदरील घटनेत मृत्यू पावलेले साईनाथ हे जाफराबाद शहरातील सागर नाष्टा सेंटर येथे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.हलाखिची परिस्थिती असुन रोज -मजुरी करुन ते आपल्या संसाराचा गाडा हाकत होते अशातच त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि होत्याचे नव्हते झाले. त्यांच्या अपघाती निधन झाल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.त्यांच्या या अपघाती मृत्यूमुळे जाफराबाद तालुक्यातून तसेच सिपोरा अंभोरा गावं वं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleअल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोलिसांना निवेदन सादर
Next articleमी.. कविता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here