Home अमरावती महाराष्ट्रात आम्ही स्वातंत्र्य लढणार, समाजवादीच्या अबू आजमी यांची घोषणा.

महाराष्ट्रात आम्ही स्वातंत्र्य लढणार, समाजवादीच्या अबू आजमी यांची घोषणा.

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240304_065950.jpg

महाराष्ट्रात आम्ही स्वातंत्र्य लढणार, समाजवादीच्या अबू आजमी यांची घोषणा.
————-
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
समाजवादी पक्ष इंडिया आघाडीमध्ये उत्तर प्रदेश मध्ये सहभागी असला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही स्वातंत्र्य आहोत. आमची कोणाशीही युती नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष हा धर्मनिरपेक्ष उमेदवाराच्या सोबत राहील, अशी भूमिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आज मी यांनी आज रविवारी पत्र परिषदेत पष्ट केले. सध्या देशात संविधान विरोधी लोकसत्तेत आहेत त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात संविधान बचाव, देश बचाओ. यात्रा सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी अबू आझमी अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अबू आज मी म्हणाले देशात ७०/: टक्के नागरिक हे शेतकरी आहेत, देशभरातील शेतकरी आज संकटात असून महाराष्ट्रात जवळपास 3000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी सरकारकडे कोणतीही धोरण नाही. देशावरील कर्ज हे चार पटीने वाढले, तर दुसरीकडे कार्पोरेट क्षेत्रातील उद्योगपतीचे १० लाख कोटी सरकारने मार्क केले. देशातील गरिबाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, या सर्व प्रश्नाकडे दुर्लक्ष करून देशात धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. लव्ह जीहादच्या नावावर हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील न्यायालयाचे निर्णय देखील भावनिक आणि आस्थेच्या नावावर दिले जात असतील, तर या देशातील अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांना कधी न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही देशाच्या विरोधात हिंदू मुस्लिम व्यक्तीसाठी लढा देत आहोत आणि आगामी लोकसभा निवडणुकीतही आम्ही धर्मनिरपेक्ष उमेदवारासोबत राहणार असल्याने अबू आझमी म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजप एकच नाण्याचे दोन बाजू असल्याचे सांगत काँग्रेसवरही निशाण साधला. काँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या होत होत्या. असते मुस्लिम आरक्षण देण्याची गोष्ट करतात परंतु जेव्हा ते सत्य होते तर त्यांनी मुस्लिम आरक्षण का दिले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये जारी इंडिया आघाडीमध्ये समाजवादी पक्ष असला तरी महाराष्ट्रात स्वातंत्र्य निर्णय घेण्याचा अधिकार नेत्यांनी दिल्याचे अबू आझमी यांनी पोस्ट केले.

Previous articleआधी जागा वाटपावर निर्णय घ्या, नाहीतर आम्ही स्वातंत्र्य: बच्चू कडू यांचा महायुतीला इशारा.
Next articleदुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here