Home बीड एसटी आगारात येणार इलेक्ट्रिकल बसेस; तिकीट दरही राहणार आवाक्यात

एसटी आगारात येणार इलेक्ट्रिकल बसेस; तिकीट दरही राहणार आवाक्यात

70
0

आशाताई बच्छाव

IMG_20240223_075052.jpg

एसटी आगारात येणार इलेक्ट्रिकल बसेस; तिकीट दरही राहणार आवाक्यात

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि: २२ बीडच्या एसटी आगारात लवकरच १८२ इलेक्ट्रिकल बसेस येणार असून यांचे तिकीट दरही आवाक्यात राहणार आहे. बीड एसटी आगाराच्या ताफ्यात थोडे थोडके नव्हे तर १८२ इलेक्ट्रिकल बसेस लवकरच येणार आहेत. या बसेस एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास ३५० ते ३६० किलोमीटर पर्यंत चालू शकतील. याची एका दिवसात फक्त एकदाच चार्जिंग करावी लागेल. याचा वेग १२० किलोमीटर प्रति तास असणार आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम माजलगाव आगारात या इलेक्ट्रिकल बसेस येणार आहेत. या नवीन बसेस आल्यानंतर बसेसची अपुरी संख्या काही प्रमाणात कमी होणार आहे. या सर्व बसेस वातानुकूलित राहणार असून यांचे तिकीट दरही प्रवाशांच्या आटोक्यात राहणार आहे. एसटीच्या शिवनेरी किंवा इतर वातानुकूलित बस एवढे याचे तिकीट राहणार नाहीत. या इलेक्ट्रिकल बस निर्मितीसाठी राज्य परिवहन महामंडळाने नामांकित कंपनीची निवड केली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर मध्येच राज्य परिवहन महामंडळकडुन ९२ बसेस घेण्यात आल्या होत्या. या बसच्या कामगिरीच्या आधारेच इलेक्ट्रिकल बसेस जास्त संख्येने घेण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाकडून घेण्यात आला आहे. या बससाठी फक्त विजेचा खर्च राज्य परिवहन महामंडळाकडे राहणार असून याची देखभाल व दुरुस्ती संबंधित कंपन्यांकडे राहणार आहे. इलेक्ट्रिकल बसेस मुळे प्रदूषणात होत असलेली वाढ व इंधन खर्च सुद्धा कमी होणार आहे. ही बाब लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळ चालू वर्ष अखेर पर्यंत ५००० इलेक्ट्रिकल बसेस प्रवाशांच्या सेवेत आणणार आहे. बीड विभागासाठी पहिल्या टप्प्यात एप्रिल अखेरपर्यंत ५५ बसे दाखल होणार आहेत. शासनाकडून विविध योजनांद्वारे प्रवाशांना वाहतूक दरात सवलत दिली जात आहे. वाढता इंधन खर्च व प्रदूषण लक्षात घेता प्रवासासाठी बीड विभागातील ०८ आगारांसाठी दोन टप्प्यात १८२ इलेक्ट्रिकल बसेस दाखल होणार आहे. या इलेक्ट्रिकल बसेसचे नाव शिवाई ठेवण्यात आले आहे.

Previous articleफुटपाथ दुकानदाराचे निवासी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन…
Next articleअमरावती येथील मधील केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग, आरोग्य उपसंचालकांनी केली लॅबची पाहणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here