Home नाशिक खडक माळेगावला गोखले इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती साजरी

खडक माळेगावला गोखले इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती साजरी

109
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_071729.jpg

खडक माळेगावला गोखले इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती साजरी

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

गोखले एज्युकेशन सोसायटीचे नामदार गोपाळकृष्ण गोखले इंग्लिश मिडीयम स्कूल खडक माळेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खडक माळेगाव येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे N.G.K.G इंग्लिश मिडीयम स्कूल निफाड येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन करण्यात आली. त्यानंतर मोठ्या आवाजात शिवगर्जना देण्यात आली तसेच शिवजयंतीसाठी N.G.K.G इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. रेणुका भार्गवे मॅडम, पालक उपाध्यक्ष श्री सचिन क्षिरसागर तसेच इतर पालक योगेश रायते,सदाशिव राजोळे, रविद्र जाधव ,विकास जेऊघाले,राहुल शिंदे,ऊत्तम पगार,सोमनाथ भोसले आदी पालक उपस्थित होते .लिपिक सौ. कीर्ती थेटे, शिक्षिका सौ. सुरेखा जाधव, मिस मनाली जोशी, इतर स्टाफमध्ये कृष्णा जेऊघाले, हरिभाऊ नितनवरे , सौ स्नेहल क्षिरसागर इत्यादी उपस्थित होते. त्यानंतर आर्या शिंदे,संस्कृती मेधने,प्रणव रायते,जयदीप शिंदे,यजुवेंद्र रहाणे,शार्वी शिंदे,रूद्र भोसले,वेदांत शिंदे,समीक्षा शिंदे,प्रांजल कापडी,अथर्व जेऊघाले,संकल्प जोशी,राम जेऊघाले या सर्व विद्यार्थ्यांनी भाषण खूप छान सादर केले, पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी मुख्याध्यापिका सौ. रेणुका भार्गवे यांनी भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कोमल सोनवणे यांनी केले व आभार प्रदर्शन ही त्यांनीच केले. फलक लेखन सौ.स्नेहल क्षिरसागर व सौ.कीर्ती थेटे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली अशाप्रकारे मोठ्या आनंदात व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय शासक होते. ज्यांनी मराठी साम्राज्य उभं केलं. त्यामुळे महाराजांना एक अग्रगण्य वीर आणि अमर स्वातंत्र्य सेनानी म्हटलं जातं. वीर शिवाजी राष्ट्रीयतेचे जीवंत प्रतीक होते.बहुगुणी प्रतिभावान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रात 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते पण अनेक संघटना शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हिंदू कॅलेंडरप्रमाणे येणाऱ्या तिथी अनुसार साजरा करतात

कु आर्या अजित शिंदे
गोखले इंग्लिश मीडियम स्कूल खडक माळेगाव

Previous articleस्वत:ला सकारात्मक लोकांसोबत ठेवणे भविष्यकाळासाठी गरजेचे —
Next articleनाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव संपन्न–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here