Home नाशिक राजेंद्र पाटील राऊत राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित

राजेंद्र पाटील राऊत राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित

43
0

दिलीप चव्हाण

IMG_20240219_051957.jpg

राजेंद्र पाटील राऊत राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित
(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ)
नाशिक – युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि युवा मराठा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक व आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना काल नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला “राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार २०२४” मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येऊन गौरविण्यात आले.
छावा जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून देण्यात येणारे हे पुरस्कार यावर्षी महाराष्ट्र भरातून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन आपल्या कार्याचा ठसा वेगळा ठसा उमटविणाऱ्या ७५ पुरस्कार्थीना हा पुरस्कार देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.कालिका माता मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सक्षम पोलिस टाईम्सचे मुख्य संपादक विलास पाटील, विलास सुर्यवंशी, छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक शरद अण्णा पवार,अँड अलका मोरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध ठिकाणांहून आलेल्या पुरस्कार्थीना मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह,गौरव पत्र,व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी सर्व पुरस्कार्थीना भगवे फेटे बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यामुळे काल नाशिकच्या कालिका माता सभागृहात काही काळ वातावरण भगवेमय झाले होते.तर युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना त्यांनी आजवर केलेल्या संघर्षाची जाण ठेवून आणि अठरा पगड जाती धर्माच्या बारा बलुतेदार सहका-यांना सोबत घेऊन जी लोकचळवळ उभी केली आहे त्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार कल्याण वकील संघाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी युवा मराठाचे कैलास बाविस्कर, अँड विनया नागरे, दिलीप चव्हाण, राजेंद्र वाघ, पंकज गायकवाड, इम्तियाज अतार, प्रमोद पवार सह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
आयुष्याचे सार्थक झाले..!
लहानपणापासून सतत मराठा समाजा सोबतच बहुजन समाजातील विविध प्रश्नांवर लढा देऊन आंदोलन केलीत.संघर्ष केला.अनेक अडथळे आले.संकटे आली.विरोधकांनी माझे खच्चीकरण करण्यासाठी माझ्यावर भ्याड स्वरुपाचा प्राणघातक हल्ला करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला.मात्र केलेल्या चांगल्या कार्याची दखल घेऊन आज मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले यातच माझे जीवन सार्थकी लागले.यापुढे उमेदीने व हिंमतीने आपला लढा हा समाजातील प्रत्येक घटकावर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात असल्याचे राजेंद्र पाटील राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

Previous articleवृत्तपत्र क्षेत्र मोडीत काढण्याचे केंद्र शासनाचे षडयंत्र थांबवा
Next articleमालेगांवी जय शिवराय ग्रुपचा आगळा वेगळा उपक्रम श्री शिव जन्मोत्सव निमित्त शिव चरित्र वाटण्याचा निर्धार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here