Home उतर महाराष्ट्र भयानक आणि तितकंच संतापजनक वास्तव…! एका प्रार्थनास्थळात 55 वर्षीय इसमानं अल्पवयीन मुलीवर...

भयानक आणि तितकंच संतापजनक वास्तव…! एका प्रार्थनास्थळात 55 वर्षीय इसमानं अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

119

आशाताई बच्छाव

IMG_20240217_160410.jpg

भयानक आणि तितकंच संतापजनक वास्तव…! एका प्रार्थनास्थळात 55 वर्षीय इसमानं अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु.                                        नेवासा -अहमदनगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी 

नेवासे तालुक्यातल्या सोनईजवळ असलेल्या बेल्हेकरवाडी रोड परिसरातल्या एका प्रार्थना स्थळामध्ये 55 वर्षीय इसमानं पाचवीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या अत्याचाराचा व्हिडिओ काही तरुणांनी सोनई पोलिसांना दाखवला. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गुरूवार (दि. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास ही संतापजनक घटना उघडकीस आली. हा प्रकार समजताच सोनई आणि सोनई परिसरातल्या हजारो तरुणांनी सोनई पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी करत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं. अल्पवयीन मुलीला या प्रार्थना स्थळामध्ये 55 वर्षीय इसमानं चॉकलेटचं आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे परिसरात उलट सुलट चर्चा सुरु आहे. याविषयी माहिती समजताच ग्रामीण विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील रात्री उशिरापर्यंत थांबून होते. एपीआय आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. या प्रकारामुळे परिसरातल्या महिला वर्गामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा सर्व परिसरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.