
आशाताई बच्छाव
मुंबई पोलीस शुभम आगोणे हत्याप्रकरणातील एका आरोपीला धुळ्यातून अटक
प्रतिनिधी/चाळीसगाव -विजय पाटील
14 जानेवारी 2024 रोजी मुंबई पोलीस दलातील शुभम आगोणे याचा खून करण्यात आला होता त्यातील काही आरोपी घटना स्थळावरून ताब्यात घेण्यात आले होते तर काही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते.चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा. रजी. क्रमांक. 24/2024 भादवी 302, 307, 324, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 व इतर अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपी सिद्धांत आनंदा कोळी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता, त्याचा व इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आलेले होते.
आरोपीचा शोध सुरू असताना पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि सागर ढिकले, पो.ना. राहुल सोनवणे, पो.शी. आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे, प्रकाश पाटील यांनी सिद्धांत आनंदा कोळी, वय 27 वर्षे, रा. छाजेड ऑइल मिल पाठीमागे, घाट रोड, चाळीसगाव याला शिरूड चौफुली, धुळे रोड ता. जि. धुळे येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याला चाळीसगांव शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.*