
आशाताई बच्छाव
जिजाऊ ब्रिगेड देगलुर तर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा.
देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)
देगलूर :-शिवश्री श्रीकांत जयराम ठिकाणे यांनी 2022 मध्ये महाराष्ट्र लोक सेवा आयोग (M P S C ) यांनी घेतलेल्या वर्ग एक पदासाठी च्या परीक्षेत राज्यात 31 वी रंँक मिळवली , तसेच श्री योगेश किशनराव पाटील, आडलुरकर यांनी पण 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (M P S C ) ची स्पर्धा परीक्षा उतीर्ण होऊन घवघवीत यश प्राप्त केले त्या बद्दल शुभेच्छा देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड देगलूर ने कौतुक सोहळा साजरा केला , या वेळी जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष शिवमती संजिवनी ताई सुर्यवंशी , उपाध्यक्ष शिवमती शिलाताई देशई देगावकर , कार्य आद्यक्ष शिवमती वैशाली ताई जाधव , मार्गदर्शक शिवमती मिनाताई सुर्यवंशी, संघटक शिवमती सुशिलाताई गाडवे , व मराठा सेवा संघाचे माजी आध्यक्ष अंँड . शिवश्री रमेशराव जाधव सर , केद्र प्रमुख शिवश्री एच पी सुर्यवंशी साहेब , शिवश्री डांँ सुनील जाधव , शिवश्री अच्युत पाटील सुर्यवंशी , सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.