Home Breaking News सटाणा तालुक्यातील मुळाणेत वायररोप तुटुन तिघांचा दुदैवी मृत्यू

सटाणा तालुक्यातील मुळाणेत वायररोप तुटुन तिघांचा दुदैवी मृत्यू

262
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240204_221635.jpg

सटाणा तालुक्यातील मुळाणेत वायररोप तुटुन तिघांचा दुदैवी मृत्यू
(जगदिश बधान प्रतिनिधी)
सटाणा -आज तालुक्यातील मुळाणे गावी विहिरीतून क्रेनच्या सहाय्याने गाळ काढत असताना अचानक क्रेनचा रोपवे तुटल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने तालुक्यात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुळाणे गावातील शेतकरी यशवंत सखाराम रौंदळ यांच्या शेतातील विहिरीचा गाळ काढण्याचे काम गावातीलच क्रेन मालक विनायक नाडेकर यांना देण्यात आलेले होते.आज नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण झाल्यानंतर गाळ काढणारे कामगार गणेश तुळशीराम नाडेकर वय २६, नितीन रामदास अहिरे वय २७, गणेश विनायक नाडेकर वय २६ हे क्रेनव्दारे विहिरीत उतरत असताना अचानक वायररोप तुटल्याने तिन्ही युवक विहिरीत कोसळले.सुमारे पन्नास ते पंचावन्न फुट खोल असलेल्या विहिरीत कोसळल्याने या तिघांही युवकांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.तिन्ही युवकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेत.दरम्यान तिन्ही युवकांचे विवाह झालेले असून या घटनेमुळे त्यांचे नवखे संसार उघड्यावर पडल्याने मुळाणे गावांसह संपूर्ण सटाणा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous articleकुसळंब ता. बार्शी ग्रामपंचायत येथील विविध ९३ लाख १५ हजार रूपये विकास कामांचा उद्घाटन समारंभ
Next articleआत्मविश्वास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here