Home Breaking News परळ ब्रिजवर भीषण अपघात! ट्रकला धडकल्याने दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेले तीघे ठार

परळ ब्रिजवर भीषण अपघात! ट्रकला धडकल्याने दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेले तीघे ठार

99
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20240116-WA0102.jpg

परळ ब्रिजवर भीषण अपघात! ट्रकला धडकल्याने दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेले तीघे ठार

मुंबई (परेल):-युवा मराठा न्यूज प्रतिनिधी विजय पवार.
मुंबईतील परळ ब्रिजवर बाईक आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्य झाला आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक बसली. अपघातात दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांना तिघांचाही यात मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा समावेश आहे.परळ ब्रिजवर दामोदर हॉल समोर सकाळी 6.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाईकवरुन दोन तरुणी आणि एक तरुण प्रवास करत होते. साउथ बॉण्डने प्रवास करत असताना डिव्हायडरला धडक बसून नॉर्थ बॉण्डने जाणाऱ्या ट्रकवर बाईक जाऊन धडकली. ट्रक चालकाने स्वत:पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अपघाताची सविस्तर माहिती दिली.
अपघातानंतर बाईकच्या समोर भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला तर ट्रकचे देखील नुकसान झालं आहे. दुर्घटनेत बाईकवरील तिघे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तिघांना KEM हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. मृत झालेल्या दोघांची तनिष पतंगे (वय 24), रेणुका ताम्रकर ( वय 25 वर्ष) अशी नावे असून अद्याप एकाची ओळख पटलेली नाही.

Previous articleअखेर’हिट अँड रन’विरुद्धचे आंदोलन मागे: जिल्हाधिकाऱ्यांची यशस्वी मदती; माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आ. बच्चू कडू यांची ही भेट.
Next articleभंगार विक्रेत्याकडून चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here