Home नाशिक वेळुंजे आश्रम शाळेचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी– पारितोषिक वितरण कार्यक्रमात पल्लवी तिडके यांचे...

वेळुंजे आश्रम शाळेचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी– पारितोषिक वितरण कार्यक्रमात पल्लवी तिडके यांचे प्रतिपादन

59
0

आशाताई बच्छाव

IMG_20240113_192821.jpg

वेळुंजे आश्रम शाळेचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी–

पारितोषिक वितरण कार्यक्रमात पल्लवी तिडके यांचे प्रतिपादन

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित वेळुंजे येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी तिडके यांनी केले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक व प्राथमिक आश्रम शाळेच्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी तिडके बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष श्रीमती सरोजिनी तारापूरकर होत्या. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, कार्यकारी मंडळ सदस्य श्रीमती रंजना परदेशी, शिक्षक मंडळ अध्यक्ष दिलीप अहिरे, संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे, विजय मापारी, उमेश कुलकर्णी, माजी मुख्याध्यापिका प्रियंका निकम उपस्थित होते.
प्रारंभी आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रा.सूर्यकांत रहाळकर तसेच सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मिलिंद घाटकर यांनी केले माध्यमिक विभागाच्या अहवालाचे वाचन मुख्याध्यापक गोपाळ उघडे यांनी केले पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक शामकांत बोरसे यांनी करून दिला सूत्रसंचालन मच्छिंद्र बोडके यांनी केले तर सर्व उपस्थित त्यांचे आभार अधीक्षक प्रभाकर बागुल यांनी केले. यावेळी शाळा समिती सदस्य अतुल करंजे, अनुराधा अहिरे, बी.डी.आहेर,सूर्यभान जगताप, सरपंच राधा उघडे, उपसरपंच भारतीय बोडके, विष्णुपंत बोडके उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे व कार्यवाह राजेंद्र निकम यांनी मनोगत व्यक्त करीत सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी १७५ विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना जनबंधू, निलेश अहिरे ,अमोल शेंडे ,विक्रम बारे ,अनिल चांदवडे, नयना अहिरे, मेघा वाघ, वनिता बोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here