आशाताई बच्छाव
कटकवार विद्यालयात टाकावू पासून टिकावू उपक्रम
विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक कला वस्तू
जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचा उपक्रम
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) कृष्णमूरारी कटकवार विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे माजी आमदार व निसर्गप्रेमी जयंत कटकवार यांचे जयंतीप्रित्यर्थ टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धाचे आयोजन संस्थाध्यक्षा विद्या कटकवार व संस्थासचिव शिल्पा नशीने व प्राचार्य विजय देवगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.या स्पर्धेला नेचर क्लब सदस्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत वाया गेलेल्या तसेच निरुपयोगी विविध वस्तूपासून आकर्षक टिकाऊ कलावस्तू व उपयोगी वस्तू तयार केले.
स्पर्धेपूर्वी जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने,अनुराधा रणदिवे व पुष्पा बोरकर मॅडम यांनी स्पर्धकांना टाकावू वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायचे याचे मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत मिडलस्कुल गटातून प्रथम क्रमांक जान्हवी शेंडे,जान्हवी धकाते यांना तर व्दितीय क्रमांक लिमांशी भाजीपाले, निधी निखारे, गुंजन घरत ,ईशिका काळसर्पे तसेच सानिया रामटेके यांना तर तृतीय क्रमांक कोमल भांडारकर, मनस्वी राऊत, यक्षिका सिंधीमेश्राम यांना तसेच हायस्कुल गटात प्रथम क्रमांक रुणाली निंबेकर द्वितीय क्रमांक पूर्वा बहेकार,अथर्व बहेकार ,तृतीय क्रमांक रोहिणी भैसारे यांना तसेच कनिष्ठ महाविद्यालय गटातून डिंपल बावणे हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.प्रोत्साहनपर क्रमांक ओमेश्वरी वाढई, रश्मी कोरे,वृषाली चुटे,नव्या बावनकुळे, श्रेया सलामे यांना प्राप्त झाला.स्पर्धेचे परीक्षण पुष्पा बोरकर ,अनुराधा रणदिवे, प्रा.जागेश्वर तिडके, बी. एस. लंजे यांनी केले
कार्यक्रमाचे संचालन बी. एस. लंजे तर आभार प्रदर्शन जागेश्वर तिडके यांनी केले.