
आशाताई बच्छाव
राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धेत कु, अनुश्री राजपूत हिने पटकाविले दोन गोल्ड मेडल
वाशीम ( गोपाल तिवारी )- दिनांक 2 व तीन डिसेंबर रोजी राष्ट्रीय कराटे स्पर्धा दिल्ली येथील अखिल भारतीय नेत्रहीन संघ रघुवीर नगर नवी दिल्ली येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत अनसिंग जिल्हा वाशिम महाराष्ट्र येथील मुख्य प्रशिक्षक काना जीवा सोतो कान रियु फेडरेशन ऑफ इंडिया,महाराष्ट्र चे सिहान ,बालकिसन नवगणकर सर 5 डॅन ब्लॅक बेल्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सेनसाई सौरभ नवगणकर सर यांनी आपली 31 कराटे पट्टू चा संघ सदर स्पर्धेत उतरविला होता यामध्ये काता व कुमीते, फाईट,या दोन्ही क्षेत्रामध्ये 21 गोल्ड व 21 सिल्वर तसेच वीस ब्रांच मॅडलअसे एकूण 62 मेडल पटकाविले याबद्दल या संघाला उत्कृष्ट संघ म्हणून पहिला क्रमांक देण्यात आला
या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण ठरली ती कुमारी अनुश्री उर्फ परी राजपूत या पाच वर्षीय चिमुकलीने उत्कृष्ट कातयाचे प्रदर्शन करून पहिला क्रमांक घेऊन गोल्ड मेडल मिळवले व तसेच फाईट या क्षेत्रामध्ये सुद्धा पहिली राहून गोल्ड मेडल पटकावत उपस्थित व सर्व जजेस रेफ्रिज यांचे मनं जिंकले या चिमुकलीचे अनसिंग व वाशिम जिल्हा सह सर्वत्र कौतुकास्पद अभिनंदन होत आहे
या स्पर्धेमध्ये दिल्ली सह उत्तराखंड झारखंड उत्तर प्रदेश गुजरात पंजाब मध्य प्रदेश हरियाणा नागालँड व महाराष्ट्र मिळून एकूण 350 कराटेपटूंनी सहभाग नोंदवला होता
अनसिंग जिल्हा वाशिम महाराष्ट्र येथील संघाला अजित सिंग राजपूत सहा एक पोलीस निरीक्षक व अजय महाले पो का पोलीस स्टेशन अनसिंग यांचे विशेष सहकार्य लाभले
अनसिंग येथील कराटेपटूंचे वाशिम जिल्ह्याचे जिल्ह्यात कौतुक का स्वागत अभिनंदन होत आहे येथील पोलीस स्टेशनचेअनसिग चे प्रभारी अधिकारी संजय चौबे साहेब यांनी तसेच अनसिंग ग्रामपंचायत चे सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांनी पदक प्राप्त झालेल्या कराटेपटूंचे अभिनंदन केले आहे दिले आहेत
तसेच अनसिंग जिल्हा वाशिम येथे लवकरच राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेचे आयोजन होणार आहे असे मुख्य प्रशिक्षक सिहाण बालकिसन नवगणकर सर 5 डॅन ब्लॅक बेल्ट यांनी कळविले आहे