Home नांदेड मोकाट कुत्रे आपल्या दारी, देगलूर नगरपालिका मात्र बेजबाबदारी.

मोकाट कुत्रे आपल्या दारी, देगलूर नगरपालिका मात्र बेजबाबदारी.

98
0

आशाताई बच्छाव

IMG_20231209_082921.jpg

मोकाट कुत्रे आपल्या दारी, देगलूर नगरपालिका मात्र बेजबाबदारी.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

नागरिकांना चोरापासून नव्हे तर कुत्र्यांपासून संरक्षण द्या अशी म्हणायची वेळ आली…जनसेवक शिवसेनेचे नेते धनाजीराव यांचा प्रशासनाला प्रश्न…???

घरात म्हणा की शेतात प्रामाणिक प्राणी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कुत्र्याला “राखण्या” म्हणून पाळल्या जातंय. अलीकडे तर शहरात विविध प्रजातीचे देशी,विदेशी कुत्रे पाळण्याची क्रेझ झाली आहे. मात्र हा कुत्रा उपद्रवी ठरला तर,काय होऊ शकते? याचे उदाहरण नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यात पाहायला मिळाले. पहाटेच्या वेळी बंधारा रोड, भायेगाव रोड, शारदा नगर, साधना नगर, आनंद नगर, भवानी चौक, मिर्झापूर रोड, रामपुर रोड, शिवनेरी नगर, जूना बसस्थानक, जिल्हा परिषद मुलांचे शाळा, साधना हायस्कूल, नांदेड रोड ई. बर्‍याच ठिकाणी मार्निंग वाॅक फिरण्यासाठी जाणाऱ्या विविध भागातील विविध ठिकाणी बर्‍याच व्यक्तींना मोकाट भटकी कुत्र्याने चावा घेतला आहे.
१) हरी मारोतीराव चाकोते (दि. ०३/१२/२०२३ बंधारा रोड, साधना नगर) (सोबत दवाखान्याचा दाखला).
२) एस. एल. देशमुख (आनंद नगर येथे सकाळी फिरायला जाते वेळी )
३) पुष्पाबाई ज्ञानोबा कुरलेवार (दि. ०३/१२/२०२३ भायेगाव रोड परिसर).
४) ICICI बँकेचे मॅनेजर महेश सर यांच्या मातोश्री याना नगरेश्वर मंदिराजवळ कुत्र्यांनी चावा घेतला.
५) भवानी चौक येथे शाळकरी लहान मुलाला कुत्र्याने चावा घेतला.
६) शिवनेरी नगर, रामपूर रोड परिसरात अनेकांना कुत्र्याने चावा घेतलेल्या तक्रारी समोर आल्या आहेत… जिल्ह्यात गतवर्षी कुत्र्यांनी बर्‍याच जणांना चावा घेतल्याची आकडेवारी चिंतादायी ठरणारी आहे. दरम्यान या भटक्या कुत्र्यांची टोळी लहान मुलांवर, येणाऱ्या जाणाऱ्यांवर आणि जेष्ठ नागरिकांवरही हल्ला करते. भटक्या कुत्र्यांनी लोकांचा बळी घेण्याची किंवा त्यातून मृत्यू ओढवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अलीकडच्या काळात पाळीव प्राण्यांनीही माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना चर्चेत आल्या.
देशात भटक्या कुत्र्यांची संख्या किती आणि कुत्रा चावण्याच्या घटना किती?
अहवालानुसार, देशात १ कोटीहून अधिक पाळीव कुत्रे आहेत, तर भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या सुमारे ३.५ कोटी आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या डेटानुसार, २०१९ मध्ये ४१४६ जणांचा कुत्र्याच्या हल्लायत मृत्यू झाला. २०१९ नंतर १.५ कोटींहून अधिक जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याला कोण जबाबदार?

भटके कुत्रे वेडे, भुकेले किंवा त्यांच्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी तत्पर असू शकतात. अशा परिस्थितीत, कुत्रे पिसाळले किंवा भडकले की माणसावर हल्ला करू शकतात. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे कुत्रा चावणं, रेबीज आणि सतत भुंकणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. भटक्या कुत्र्यांचे हल्ले थांबवण्याकडे आणि उपाययोजना करण्याकडे सरकारचं दुर्लक्ष होताना दिसतं. उत्तर प्रदेशमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशात २०१९ पासून २७.५२ लाखांना कुत्रा चावला आहे. यानंतर तामिळनाडूचा नंबर लागतो, तामिळनाडूमध्ये २०.७ लाख लोकांवर कुत्र्याचे हल्ले झाले. यानंतर तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्याचा नंबर लागतो. महाराष्ट्रातील १५.७५ लाख लोक कुत्र्याच्या हल्ल्याचे शिकार झाले आहेत.

देगलुर शहरात व ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणारा उपद्रव सातत्याने वाढत आहे. गतवर्षी कुत्र्यांनी जवळपास बर्‍याच जणांना चावा घेतलाय. दरम्यान देगलुर नगरपरिषद ने वेट्स फॉर ॲनिमल या संस्थेला संपर्क साधून संस्थे अंतर्गत भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली पाहिजे. असे जनसेवक शिवसेनेचे नेते धनाजीराव जोशी यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी यांना केले आहे. परंतु नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांचे मात्र या गंभीर गोष्टी कडे लक्ष नसुन दररोज शहरात मोकाट कुत्र्यांचा, डुकरांचा सुळसुळाट वाढला. ग्रामीण भागात देखील हीच स्थिती आहे.

देगलुर शहरातील मोकाट, भटक्या कुत्र्यांच्या, डुकरांच्या ई. चावा घेणे कुत्रे भुंकणे पाठलाग करून चावा घेणे अश्या समस्येमुळे शहरी व ग्रामीण भागातील रहिवाशांना याचे त्रास होत आहे. पण या गोष्टी कडे लक्ष देणारे कोणी नसुन बरेचसे पाळीव व मोकाट कुत्रे रहदारी च्या ठिकाणी अचानकपणे बाहेर येऊन भुंकायला लागतात. मोकाट असेल तर चावा घेईल याची भिती. बांधलेल्या कुत्रे असेल तर दोरी तोडून चावा घेईल याची भिती. त्यामुळे कुत्रे पाळीव असो की मोकाट? त्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने वेळीच उपायोजना करण्याची मागणी आता जनतेतून पुढे येत आहे.

देगलुर शहरातील भटकी कुत्री पकडण्याचा आणि त्यांचं निर्बीजीकरण करण्याचा ठेका संस्थेला द्यावे अशी मागणी जनसेवक धनाजीराव जोशी यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी यांना केले आहे. बर्‍याच वर्षांपासून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर काहीच उपाय करत नसून प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. व दावा जरी केला जात असला तरी दुसरीकडे शहरात कुत्र्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तींची संख्या वाढतच आहे. कुत्र्यानं चावा घेतला म्हणून उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांची संख्या फार मोठी आहे.

शहरातील नागरिकांना चोरापासून नव्हे तर कुत्र्यांपासून संरक्षण द्या, अशी म्हणायची वेळ आली असल्याचं शिवसेनेचे जनसेवक धनाजीराव जोशी यांनी म्हंटलं आहे. शहरातील व ग्रामीण भागातील जनते मध्ये चर्चेला उधाण आले आहे.कि, आपण भरलेल्या पैशांनी सेवा पुरवणारी संस्था अशी एक ओळख निर्माण होण्या आधी च या विषयाकडे पाहायचे दृष्टीकोन बदलत असुन विश्वास हि बसत नाही. असे जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. नागरिक नगरपरिषद कर रूपी पैसा भरून हा पैशांचा भ्रष्टाचार करत आहे का…??? असे प्रश्न चिन्ह जनतेमध्ये निर्माण होत आहे. कारण सेवा तर मिळत च नाही उलट दोन चार गोष्टी बोलणे ऐकावे लागते. शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या लवकरात लवकर दूर झाली नाही तर नगरपरिषद च्या दालनात कुत्र्यांची पिल्लं सोडण्याचा इशाराही जनसेवक धनाजीराव जोशी यांनी दिला आहे.

Previous articleचोरी झाल्यावर काही तासातच 6लाख 85 हजार रूपये किंमतीच्या मुद्देमालासह चोरट्यास केले अटक…. चाळीसगाव पोलिसांची कामगिरी
Next articleदर्यापूर अमरावती मार्गावर कार मधील तरुणीवर गोळीबार, ४ आरोपींना अटक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here