आशाताई बच्छाव
चोरी झाल्यावर काही तासातच 6लाख 85 हजार रूपये किंमतीच्या मुद्देमालासह चोरट्यास केले अटक….
चाळीसगाव पोलिसांची कामगिरी
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- येथील घाटरोडवरील कमलशांती पॅलेसमध्ये लग्न समारंभात नववधूचे दागिण्यांसह रोकड व मोबाईल असा सुमारे 6लाख 85 हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबवणाऱ्या मध्यप्रदेशातील भामट्यास चाळीसगाव शहर पेालीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने शोध घेऊन अवघ्या तीन तासांच्या आत जेरबंद केले. या भामट्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, 7 नोव्हेंबर रोजी रात्री चाळीसगाव शहरातील घाटरोडवरील हॉटेल कलमशांती पॅलेस या ठिकाणी श्रीमती सरोज मुंकुद देशपांडे यांच्या मुलीचा लग्न समारंभ आयोजीत करण्यात आला होता. विवाहसोहळ्यास मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडी आले होते.
वधूची आई श्रीमती देशपांडे यांनी नवरीचे सोन्याचे दागीणे, रोख रुपये व ऍ़पल कंपनीचा आयफोन 13 हा मोबाईल असा मुद्देमाल त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले होता. ही पर्स सोबत घेवुन त्या लग्न ठिकाणी नातेवाईकांना भेटीगाठी घेत असतांना त्यांच्याकडुन दागिणे ठेवलेली पर्स एका टेबलावर ठेवली गेली. देशपांडे ह्या नातेवाईकांना भेटुन सदर पर्स घेण्यास गेल्या असता त्याठिकाणी पर्स मिळुन आली नाही.
पर्समध्ये वधूचे दागिणे, रोख रक्कम व आयफोन मोबाईल असा सुमारे 6 लाख 85 हजार रूपये किंमतीचा ऐवज होता. अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादंवि कलम 379 प्रमाणे चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार राहुल सोनवणे, पोलीस नाईक दिपक पाटील, पोकॉ.नंदु महाजन,अजय पाटील, नितीन वाल्हे, पोकॉ. विनोद खैरनार, रविंद्र बच्छे, आशुतोष सोनवणे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली सी सी टी व्ही फुटेज वरून पोलिसांच्या व्हाट्सअप ग्रुप वर संशयित आरोपीचा फोटो टाकून
त्याची ओळख पटवून त्याने चोरलेल्या मोबाईलच्या नेटवर्क च्या आधारे बालवीर माखन सिसोदीया (वय19) रा. गुलखेडी, ता.पचोर, जि.राजगड (मध्यप्रदेश) यास पोलीसांनी बायपास रोडवरील कोदगाव चौफुली जवळ मुद्देमालासह ताब्यात घेतले पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहेत.