Home अमरावती गावाकडील बातमी पोर्टलचे आष्टी (शहीद)येथे कार्यालयाचे उद्घाटन लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक...

गावाकडील बातमी पोर्टलचे आष्टी (शहीद)येथे कार्यालयाचे उद्घाटन लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक सन्माननीय संजीवभावु म. देशमुख (अकोला)यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

75
0

आशाताई बच्छाव

IMG_20231207_065613.jpg

गावाकडील बातमी पोर्टलचे आष्टी (शहीद)येथे कार्यालयाचे उद्घाटन लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक सन्माननीय संजीवभावु म. देशमुख (अकोला)यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती./ (आष्टीशहीद)
वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे गावाकडची बातमी मुख्य कार्यालयाचे उद्घाटन लोक स्वातंत्र पत्रकार संघाचे संस्थापक व अध्यक्ष अकोला येथील सन्माननीय संजू भाऊ म.देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. लोक स्वातंत्र पत्रकार महासंघ समाजभिमुख राष्ट्रीय संघटनेचे डिजिटल मीडियाचे संपादक अमरावती जिल्हा अध्यक्ष श्री देवेंद्रजीभोंडे यांच्या गावाकडची बातमी पोर्टलचे वर्धापन दिन निमित्त मुख्य कार्यालयाचे उद्घाटन झाले. तसेच सामान्य घटकातील महिला व पुरुषावरील अत्याचार विरुद्ध लढा देण्याबाबत व त्यांना न्याय मिळण्याकरता सदैव अवरात्र सामान्य जनतांना न्याय देण्याकरता एकमेव गावाकडची बातमी पोर्टल नेहमीच वाचा फोडण्याकरता अन्याय विरुद्ध उभे राहते. आष्टी शहीद जी.वर्धा येथे लोक स्वातंत्र पत्रकार संघटनेचेतालुका शाखेची स्थापना करून, संयुक्त कार्यक्रम लोकसत्तात्र पत्रकार महासंघाचे संस्थापक व अध्यक्षसन्माननीय संजू भाऊ म. देशमुख यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न केला. या सोहळ्याच्या कार्यक्रमात पत्रकारांवर होणारा अन्याय बाबत आवाज उठवणारी व त्यांना न्याय देण्याकरता सरसपणे शासनाच्या दरबारात प्रश्न मांडण्याकरता होते सोडून घेण्याकरता तत्पर ऐक मेव ,लोक स्वातंत्र पत्रकार महासंघ तमाम पत्रकारांच्या पाठीशी उभा राहणार असा संदेश आपल्या अध्यक्ष भाषणात संजू भाऊ देशमुख यांनी या कार्यक्रम प्रसंगी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. सदर कार्यक्रम आष्टी शहीद येथे सव्वा लाखे मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाची नियोजन अतिशय सुंदर व व्यवस्थित करण्यात आले गावाकडचे बातमी पोर्टलचे संपादक देवेंद्रजी भोंडे यांनी व अनेक पत्रकार मंडळींनी उत्कृष्ट कार्यक्रम राबवून व शिस्तबद्ध नियोजन सह गावकडच्या बातमीचे अनेक पत्रकार यांनी मेहनत करून छोट्या खाणी सुंदर व व्यवस्थित कार्यक्रम केला या कार्यक्रमात अध्यक्ष लोक स्वातंत्र पत्रकार संघाचे संजय भाऊ म. देशमुख यांचे गावाकडचे बातमी संपादक देवेंद्रजी भोंडे यांनी सदर कार्यक्रम सव्वा लाखे मंगल कार्यालया येथे घेऊन आमंत्रित केलेल्या ज्येष्ठ पत्रकार तसेच महिला पत्रकार यांनाही सन्मानपत्र देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रम अध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ,सन्मानपत्र, देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विशेष लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे केंद्रीय मार्गदर्शक सन्माननीय श्री पुष्पराजगांडे लोक स्वातंत्र पत्रकार संघटनेचे संघटक डॉ.शंकररार इंगळे यांनी पत्रकाराविषयी आपले विचार मांडले. तसेच प्रमुख पत्रकार सन्माननीय जेष्ठ पत्रकार श्री रावसाहेब उर्फ देशमुख. दैनिक सुपर भारत अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी व दैनिक युवा मराठा अमरावती विभागीय संपादक. लोक स्वातंत्र पत्रकार संघटनेचे संघटक व प्रसारक.,तसेच भातकुली तालुका प्रमुख सन्माननीय खर्चनसर, तसेच गजाननराव जीरापुरे दैनिक सुपर भारत जिल्हा प्रतिनिधी व लोक स्वातंत्र्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष. यांची उद्घाटन सोहळ्यात स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या “गाव सहली”च्या महिला वर्ग तसेचपत्रकार ,महिला पत्रकार व इतर जिल्ह्यातील बहुसंख्येने अमरावती, वर्धा ,पुलगाव येथील अनेक पत्रकार मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचा अखेर संगोपन जेवणाचा स्वाद घेऊन कार्यक्रमाचा सांगोपण करुन प्रमुख अतिथी लोक स्वातंत्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तसेच पत्रकार मंडळी यांनी गुरुकुंज मोझरी येथे संत राष्ट्र तुकडोजी महाराज यांचे दर्शन घेऊन रवाना झाले. या कार्यक्रमात पत्रकार महिला व पुरुष वर्ग कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here