Home जळगाव रेल्वे उड्डाण पुलावर ओव्हरटेक करतांना कारची दुचाकीला धडक – एक ठार

रेल्वे उड्डाण पुलावर ओव्हरटेक करतांना कारची दुचाकीला धडक – एक ठार

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20231125_061846.jpg

रेल्वे उड्डाण पुलावर ओव्हरटेक करतांना कारची दुचाकीला धडक – एक ठार

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- येथील रेल्वे उड्डाण पुलावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने धामणगाव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. अपघातानंतर कार चालक पळून गेला. याप्रकरणी काराचालकाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील धामणगाव येथील अशोक भालचंद्र सुतार (36) गुरुवारी दुपारी एमएच.20 सीसी.2491 या दुचाकीने खाजगी कामासाठी धुळे रोडकडून चाळीसगाव शहराकडे येत असतंाना चाळीसगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या एमएच.19 ए एक्स 7330 या भरधाव कारने
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ओव्हरटेक करतांना अशोक सुतार यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. त्यात अशोक सुतार यांच्या डो्नयास व दोन्ही हातांना जबर मार लागून ते रस्त्यावर पडले.अपघात होताच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी त्यांना ग्रामीण रूग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत्यु झाला.
मृत अशोक सुतार हे वेल्डींग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अपघाती मृत्युने कुटुंब उघड्यावर पडले आहे.याप्रकरणी अविनाश राजेेेंद्र सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here