Home अमरावती संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचारी चे थाळी वाजव आंदोलन.

संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचारी चे थाळी वाजव आंदोलन.

230

आशाताई बच्छाव

IMG_20231117_053831.jpg

संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचारी चे थाळी वाजव आंदोलन.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संप २३व्या दिवशीही सुरूच असून, झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी गुरुवारी कर्मचाऱ्यांनी खाली बजाव आंदोलन केले. त्याचबरोबर महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील अधिकारी यांना बाबीच निमित्त ओवाळणी घालून शासकीय सेवेत समायोजना संदर्भात मागणी ही शासनापर्यंत पोहोचण्या ची विनंती देखील केली. दिवाळीचा सण हा प्रत्येकासाठी आनंद घेऊन येणारा तसेच अंधकारमय जीवनामध्ये प्रकाशाचे दिवे लावणारा सण म्हणून ओळखला जातो. परंतु कंत्राट आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी ठरल्याचे संपातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऑक्टोंबर २०२३ पासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाची राज्य शासनाने दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे नियमित होणारे लसीकरण हे पूर्णतः पूर्णतः बंद आहे. उपकेंद्र बंद पडले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या हाल होत आहे. केंद्र शासनाचे आयुष्यमान भव मोहीम पूर्णतः बंद आहे. राज्य शासनाचे एन ए टी व्ही एम कार्यक्रम पूर्ण पणे बंद आहे. नियमित लसीकरण सत्र बंद आहेत. सर्व ऑनलाईन पोर्टल जसे ई-संजीवनी एच डब्ल्यू सी एन सी डी बंद पडले आहेत. परंतु अजूनही संपाची दखल न घेतल्याने अखेर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सभामंडपाचा खाली बजा आंदोलन करत राज्य शासनाचा निषेध नोंदविला. तसेच भाऊबीजचे औचित्य साधून कंत्राटी महिला कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सा यांना ओवाळणी घातली. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची समय योजना संदर्भात मागणीचा पाठपुरावा करण्याची मागणी देखील यावेळी केली.