Home सामाजिक मराठी शाळा टिकविणे काळाची गरज

मराठी शाळा टिकविणे काळाची गरज

824
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-182531_WhatsApp.jpg

मराठी शाळा टिकविणे काळाची गरज
स्वप्निल देशमुख
मराठी माणूस टिकला पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे हे आपण नेहमी प्रमाणे बोलत आहोत. तिची स्तुतीसुमने गात आहोत. मराठी भाषेसाठी बलिदान केलेल्या वाल्यांचे स्मरण भाषण व गाण्यातून केले जाते. मराठी दिन साजरा केला जातो. नामचं वयांची भाषणे होतात. पण खरेच मराठी भाषा ही महाराष्ट्राची व्हायला पाहिजे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजे. आता अनेक कारणे दाखवून त्या बंद केल्या जात आहेत. इथे ह्याबद्दल कोणीही आवाज उठवत नाही, त्याठिकाणी इंग्रजी माध्यमाचे वर्ग उपडले आहेत. भरमसाठ फी मिळत आहे. मराठी शाळेची की कमी आणि सर्व सामान्य माणसाला परवडण्यासारखी आहे व इंग्रजी माध्यमाची की इतकी जास्त असून देखील पालक मराठी शाळेकडे फिरवून
पालक मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये आपल्या पाल्याला शिकवण्यासाठी धडपड करत असतात. शाळा शिक्षण देण्याचे कारण नसून पालकानी एकमेकांसोबत लावलेली स्पर्धा व एक व्यवसाय झाला आहे असेच म्हणावे लागेल. आपल्या मुलांना मराठीची
खाली करण्यासाठी पटसंख्येचे कारण दाखवून मराठी शाळा पाटयाने बंद करत आहेत. काही संस्थाचालक मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यावर भरमसाठ फी घेत आहेत. सुविधासुद्धा मिळत नाही. शौचालयासाठी शिक्षकांना पाणी मिळत नाही मराठी माध्या शिक्षकांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे. त्यांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मराठी शाळेची दुरावस्था होत चालली आहे. इंग्रजी शाळेमुळे मराठी शाळेत शिकलेल्या किंवा आता विद्यार्थी शिकतात त्यांच्यामध्ये न्यूनगंड उत्पन झालेला दिसून येतो. संस्कार, मूल्ये वासळत चालली आहे. याचा परिणाम हल्लीच्या पिंडीवर होत आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमाचे पुन्हा विलीनीकरण करण्यात यावे जो पर्यंत होत नाही तोपर्यंत असेच होणार हे निश्चित हेच कारण मराठी शाळा बंद होण्यामागचे आहे.

मराठी शाळा टिकविणे काळाची गरज

अस्मिता कशी जपायची हे सोडून इंग्लिशमध्ये बोलणे म्हणजे अभिमान वाटू लागला आहे. हे मराठी माणसाचे
दुर्दैव म्हणावे लागेल. आता तर हजारो शिक्षकांवर बेरोजगार होण्याची भिती निर्माण झाली आहे.
प्रामाणिक शिक्षकांना त्यांच्या अध्यापनाचे श्रेय मिळत नाही.अंतर्गत चांगल्या गुणवंत शिक्षकांना याचा फटका बसत आहे. याचाही परिणाम मराठी शिक्षणात होत आजही वास्तव आहे. विचारधारा अजूनही बदललेली नाही. मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला खरा, पण खरे साहित्यिकांचे वास्तव साहित्य विद्यार्थ्यांना मिळत नाही ही शोकांतिका आहे.

✍🏻 स्वप्निल देशमुख (पत्रकार ) बुलढाणा जिल्हाध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तथा दै. युवा मराठा सह संपादक

Previous articleनाशिकमध्ये अवैध शस्त्रास्त्रे बाळगणा-यांना अटक
Next articleधर्माचे स्टेटस ठेवल्याने स्वतःचे स्टेटस उंचावत नाही -पंकज वानखेडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here