Home अमरावती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले आज बुधवारी अमरावती शहरात. निवडणुकांची तयारी सुरू; लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांशी...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले आज बुधवारी अमरावती शहरात. निवडणुकांची तयारी सुरू; लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधणार.

114

आशाताई बच्छाव

Screenshot_20231011-061717_WhatsApp.jpg

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले आज बुधवारी अमरावती शहरात. निवडणुकांची तयारी सुरू; लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधणार.
——————————
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.

अमरावती.
येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुका व संघटनात्मक मुद्द्याच्या पार्श्र्वभूमीवर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आगामी बुधवारी 11 ऑक्टोंबर रोजी अमरावती दाखल होत आहे येथील काँग्रेस भावना ते विभागातील पात्री जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पक्ष पद्धती पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक हैदराबाद येथे नुकतीच पार पडली. त्यातील निर्देशानुसार ही बैठकी विभागीय होत आहे. बैठकीला तेलंगणा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष संध्याकाळी सव्वा लाखे उपस्थित राहतील. या विभागीय बैठकीचे समन्वयक नाना गावंडे आहेत. उदयपूर (राजस्थान) शिबिरातील निर्णयाच्या अमलबजावणी मंडळ कमिट्या व बुतप्रमुखांची (बी.एल.ए.) सध्या स्थिती, ब्लॉक कार्यकारणीचीमाहीती, जिल्ह्यातील संघटनात्मक रिक्त पदाची स्थिती, आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीच्या पूनरिक्षण कार्यक्रमाबाबत झालेली कारवाई, जिल्हा व ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या ठराव बुकाची तपासणी आदी मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. प्रदेशाध्यक्षाच्या नियोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी १० वाजता अमरावती शहर,१०.४५ वाजता अमरावती ग्रामीण, ११.३० वाजता बुलढाणा, १२.१५ वाजता वाशिम, दुपारी २ वाजता यवतमाळ,२.४५ वाजता अकोला शहर व दुपारी ३.३० अकोला ग्रामीण अशा प्रकारे या बैठकीत पुढे जातील . या बैठकीला सर्व जिल्हा तसं प्रभारी सह प्रभारी, जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्ह्यातील नेते, आजी माजी खासदार आमदार, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे,. अध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व विभाग व सेलचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहे. या बैठकीला उपस्थित उपस्थित राहण्याचे आवाहन आव्हान जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले आहे.

Previous articleकुणबी समाज तुमसर-मोहाडी च्या वतीने “महाआरोग्य शिबिर 2023” संपन्न ‘
Next articleनैसर्गिक आपत्तीत समावेश करा: आमदार प्रवीण पोटे पाटील यांची कृषिमंत्र्याकडे मागणी; सरकार दखल घेईल , अशी अपेक्षा. ——————————-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.