Home बुलढाणा घरकुल द्या”नाहीतर बायको द्या..! कोद्री येथील ३० वर्षाच्या तरूणाची शासनाकडे अजब’गजब मागणी..

घरकुल द्या”नाहीतर बायको द्या..! कोद्री येथील ३० वर्षाच्या तरूणाची शासनाकडे अजब’गजब मागणी..

454

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0107.jpg

घरकुल द्या”नाहीतर बायको द्या..!

कोद्री येथील ३० वर्षाच्या तरूणाची शासनाकडे अजब’गजब मागणी..

(ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा)
संग्रामपूर पंचायत समितीच्या कार्यालयात एका ३० वर्षीय तरुणाने बिडीओंना” भेटून एक “अजब गजब” मागणी केली आहे.
घर नसल्याने बायको मिळत नसल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.
त्यामुळे एकतर आपल्याला घरकुल द्यावे नाहीतर बायको द्यावी अशी मागणी तरुणाने केली आहे. संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथील अंकुश नत्थुजी कड या तरुणाने लक्षवेधी मागणी केली आहे. अंकुश च्या म्हणण्यानुसार त्याचे नाव घरकुलाच्या यादीमध्ये ३५ व्या क्रमांकावर आहे. मागील गेल्या ५ वर्षात घरकुल योजनेतून गावात केवळ ५ घरांचे बांधकाम झाले.त्यामुळे माझा ३५ वा नंबर येईपर्यंत मी म्हातारा होईल, तेव्हा घर देता काय ?
असा सवाल अंकुशने पंचायत समिती संग्रामपूर चे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून दिलेल्या निवेदनातून केला आहे.
आम्हाला घर नसल्याने गावातील लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. ३० वर्षांचे वय होऊनही घर नसल्याने आम्हाला कोणी पोरगी देईना, ज्या गतीने घरकुल योजनेची कामे होत आहेत, त्या गतीने ३५ वा नंबर यायला अजून ३०-३५ वर्षे लागतील. तोपर्यंत मी म्हातारा झालेलो असेल. त्यामुळे एकतर घरकुल द्या नाहीतर बायको द्या अशी मागणी अंकुशने सरकारकडे केली आहे. सरकारने मागणीची दखल घेतली नाही तर मी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी आंदोलन करेल त्यामुळे जीवाचे बरेवाईट झाल्यास याला शासन जबाबदार राहील. असे कोद्री येथील अंकुश कड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
♦️ माझे घरकुलाच्या यादीत ३५ वा नंबर, असून मागील ५ वर्षात पूर्ण गावात फक्त ५ घरे झाली, मग मला काय म्हातारा झाल्यावर प्रशासन घरकुल देईल काय..

Previous articleमुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता।
Next articleसामूहिक बलात्कार:५ ऑक्टोंबर पर्यंत त्या चार नराधामांच्य तीन रात्री पोलीस कठडीत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.