आशाताई बच्छाव
मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार विभागीय संपादक ) :येथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आज दिनांक 3 तीन आक्टोंबर रोज मंगळवार ला प्राथमिक आरोग्य केंद्रला भेट दिली असता, निम्मे कर्मचारी रजेवर आढळले, तर काही कर्मचारी गडचिरोली येथून आवागमन करीत असल्यामुळे वेळेवर कर्तव्याला उपस्थित राहत नाही त्यामुळे 8-30 वाजता दवाखाना उघडण्याची वेळ असून 10-30 वाजेपर्यंत रुग्णाला डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची वाट बघत ताटकळत राहावे लागते अशा परिस्थितीत एखादा रुग्ण आती आजारी असल्यास त्यांना वेळेवर अति आवश्यक सेवा प्राप्त होत नाही.
येथील नेत्रचिकित्सक संकेत लंपाटे यांचे मंगळवार व बुधवार असे दोन दिवस कर्तव्य असते परंतु ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भेट दिली असता त्यांच्या दालनाला कुलूप लागले होते.
तसेच जी. एन. एम. वैशाली बजाईत या सुद्धा मागील दोन महिन्यापासून कर्तव्यावर हजर नाहीत.
मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे येथील कार्यरत कर्मचारी यांची संख्या वाढविण्यात यावी, नेत्र चिकित्सक संकेत लंपाटे यांना नियमित करण्यात यावे,. येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल बनसोड हे सभेसाठी गडचिरोली येथे असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही,
करिता या सर्व बाबीकडे आवर्जून लक्ष देऊन अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरळीत करावी. यापूर्वी संपूर्ण परिसरातील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले होते त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे अशी मागणी केली होती ती पूर्ण करावी अशी मागणी सरपंच शिवप्रसाद गवर्णा , मथुराम मलिया माजी सदस्य मुनीर भाई शेख, सदस्या अंजू ताई मैदमवार, सदस्य राजू कोठवार अभिजीत मेश्राम, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी मागणी केली आहे.