Home नाशिक देवळाली कॅम्प ते भगुर रस्त्यावर खड्डेच खड्डे

देवळाली कॅम्प ते भगुर रस्त्यावर खड्डेच खड्डे

172

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0051.jpg

देवळाली कॅम्प ते भगुर रस्त्यावर खड्डेच खड्डे

सूदर्शन बर्वे (भगुर प्रतिनिधी)
देवळाली कॅम्प ते भगुर ह्या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांना हा रस्ता पार करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे हा नविन रस्ता मंजूर करण्यात आला होता तो आँगस्ट २०२३ पर्यत तयार करण्यात येणार होता परंतु तरी आज पर्यंत प्रशासनाच्या वेळ काढू पणा मुळे हा मार्ग गेल्या वर्षा पासून तसाच आहे गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात डागडुजी करण्यात आली असून नवीन रस्ता काही झालाच नाही आणि याचा त्रास मात्र पंचक्रोशीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे या मार्गावरून मार्गक्रमण करतात वाहन चालवताना विशेषतः देवी मंदिर परिसरात, केंद्रीय विद्यालय, नागझिरा ह्या ठिकाणी खूप खड्डे पडले आहे आणि या मुळे छोटे मोठे आपघात हि होत आहे पंचक्रोशीतील नागरिकांना काही तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी ही रुग्णवाहिकेला याचा सामना करत रूग्णांना दवाखान्यात दाखल करावे लागत आहे येत्या काही दिवसांत नवरात्र उत्सव चालू होणार असून या ठिकाणी रेणूका देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे व या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दर वर्षी यात्रा भरते. खड्यांनमूळे रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्याप्रमाणात रांगा लागल्याने नागरिकांना होणार्‍या त्रासाबद्दल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तरी या बाबत प्रशासनाने लवकर रस्ता करावा हि मागणी आता जोर धरू लागली आहे

Previous articleनाशिकमध्ये मोहम्मद पैंगबर यांच्या जयंतीनिमित प्रसाद वाटप व दुवा पठण संपन्न
Next articleधुळे.. जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.