Home उतर महाराष्ट्र म्हसदीच्या आदर्श विद्यालयाच्या गणरायांचे सातव्या दिवशी उत्साहात विसर्जन

म्हसदीच्या आदर्श विद्यालयाच्या गणरायांचे सातव्या दिवशी उत्साहात विसर्जन

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0076.jpg

म्हसदी,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे):--साक्री तालुक्यातील ककाणी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील गणरायाचे काल सातव्या दिवशी वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. सकाळी पाच जोडप्यांची हस्ते महाआरती करून गणरायाची ककाणी गावठाण मधून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव उत्तमराव बेडसे, संचालक बारकू बेडसे,अरुण बेडसे, रावसाहेब बेडसे,एन.डी. शिंदे, रवींद्र बेडसे, निंबा नाना बेडसे, डॉ. अनिल बेडसे, हरी सोनवणे, प्रमोद सोनवणे, नानाजी मोहिते आदी, सौ. सुवर्णा बेडसे उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक भटू वाणी यांच्या मार्गदर्शनाखालीव्ही. वाय.कुवर, पी.डी. शेवाळे, जी.एम‌. मारणर, के.व्ही. देवरे, एन.डी. शिंदे, बी.आर. सोनवणे, प्रसाद बेडसे, सुषमा महाले, कुणाल बेडसे, दीपक पवार, बापू गायकवाड, दयाराम पवार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी ग्राम पुरोहित गणू महाराज दीक्षित यांनी गणेश विसर्जना निमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. तसेच गणेश उत्सव काळात विद्यालयात संगीत खुर्ची, मडके फोड, गाढवाला शेपटी लावणे, गोणपाट शर्यत, रान भाजी मेळावा तसेच शाडूच्या मातीपासून गणपती बनवणे यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

Previous articleजिल्ह्याचा गौरव विकासात्मक कार्यात वाढविण्याकरीता उद्योजकांनी योगदान द्यावे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
Next articleमालेगांव पंचायत समितीच्या गणपती बाप्पांचे उत्साहात विसर्जन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here