Home गडचिरोली लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांचा आरमोरी विधानसभेत दौरा

लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांचा आरमोरी विधानसभेत दौरा

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20230807-WA0061.jpg

लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांचा आरमोरी विधानसभेत दौरा

महाविजय 2024 जनसंपर्क अभियाना अंतर्गत वडसा येथे आम. कृष्णाजी गजबे व भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) :-

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री तथा लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी काल दिनांक 6 ऑगस्ट रोजी महाविजय 2024 जनसंपर्क अभियाना अंतर्गत आरमोरी विधानसभा क्षेत्राचा दौरा केला व वडसा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णजी गजबे व भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली तसेच आगामी कार्यक्रम व नियोजनाची माहिती दिली. याप्रसंगी आम. कृष्णाजी गजबे, वडसा नप चे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सोशल मीडियाचे पूर्व विदर्भ संयोजक आनंद खजांची, गणपत सोनकुसरे जिल्हा उपाध्यक्ष, वसंतराव दोंनाडकर तालुका महामंत्री, ओमकार मडावी सोशल मीडिया सहसंयोजक, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर नाकाडे, शंकर पारधी सदस्य ग्रामपंचायत कुरुड, वॉर रूमचे सदस्य जगतराम ठेंगरी, कुलदीप आमले, निशांत नेवारे, रजत कुथे व भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांनी आम. कृष्णाजी गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली असता आम. कृष्णाजी गजबे व पदाधिकाऱ्यांनी प्रमोद पिपरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व लोकसभा क्षेत्र समन्वयक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यानंतर प्रमोद पिपरे यांनी भाजपा पदाधिकारी तसेच आम कृष्णाजी गजबे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली व वॉर रुम, सोशल मीडिया टीम, मंडल समिती, बुथ समित्या तसेच शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली व वॉर रुम व सोशल मीडिया टीम चांगली व मजबूत असल्याने समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी आगामी नियोजन व कार्यक्रमाची माहिती देताना प्रमोद पिपरे यांनी सांगितले की, आरमोरी विधानसभा क्षेत्रात 100 ते 150 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक टीम तयार करून त्या टीमला चांगले सक्षम व मजबूत बनवून त्या शंभर लोकांना एका व्यक्तीला तीन बुथाचे प्रभार देण्यात यावे, विधानसभा कोअर ग्रुप 15 लोकांचे गठन करण्यात यावे, प्रत्येक बुथावर पक्षाचे नियमित 6 कार्यक्रम होतील याबाबत योजना तयार करणे, 16 ऑगस्ट 2023 पर्यंत 15 हजार नव मतदार नोंदणी करणे , प्रत्येक विधानसभेत जनसंघ व भाजपाचे वरिष्ठ ते ज्येष्ठ अशा 500 नागरिकांची यादी तयार करणे. फ्रेंड्स ऑफ बीजेपी , धन्यवाद मोदीजी अभियान, नव मतदार नोंदणी, युवा वारीयर्स यांचे प्रत्येकी 500 सदस्य तयार करणे, माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रवास दौरा आहे त्यानिमित्ताने प्रत्येक विधानसभेमध्ये घर चलो अभियान व प्रमुख 100 कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करणे अशी माहिती यावेळी लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली.
यावेळी लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांनी आम. कृष्णाजी गजबे यांच्या आरमोरी विधानसभा क्षेत्राची संपुर्ण माहिती जाणून घेतली व भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले व तालुका व मंडल कार्यकारिणी अधिक सक्षम करून निवडणुकांमध्ये बुथ महत्वाचे असल्याने बुथाकडे लक्ष केंद्रित करून बुथ समिती अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा असे आवाहन यावेळी प्रमोद पिपरे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

Previous articleजिल्ह्यातील ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत आदिम जमाती समाजाच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्या
Next articleखान्देश वारकरी सेवा मंडळ कडून मुकटी येथे मेळावा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here