Home नांदेड खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे युपिएससी च्या 53 विद्यार्थ्यांना अनुभवता आले...

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे युपिएससी च्या 53 विद्यार्थ्यांना अनुभवता आले संसदीय कामकाज

263

आशाताई बच्छाव

IMG-20230728-WA0065.jpg

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे युपिएससी च्या 53 विद्यार्थ्यांना अनुभवता आले संसदीय कामकाज
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
नांदेड : प्रशासकीय सेवेत सहभागी होऊन देशाच्या लोकशाहीला अधिक बळकट करण्याचे अनुषंगाने प्रयत्नशील असलेल्या आणि एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणाऱ्या 53 विद्यार्थ्यांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामुळे भारतीय संसदेचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवता आले . दिनांक 27 जुलै आणि आज 28 जुलै रोजी ५३ विद्यार्थ्यांनी संसदीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

लोकसभेचे कामकाज कसे चालते, कामकाजाच्या पद्धती , प्रशासकीय कामकाजाचा अनुभव या सर्व बाबी एक कोतवालाचा विषय असतो त्यामुळे संसदेत प्रत्यक्ष बसून कामकाज पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ही पर्वणीच असते. या अनुषंगाने दिल्ली येथे एमपीएससी यूपीएससी ची तयारी करणाऱ्या 53 विद्यार्थ्यांनी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन संसदीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याची संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोकसभेतील संसदीय कामकाजाचा अनुभव विद्यार्थ्यांना पाहता यावा यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र व्यवहार करून परवानगी मागितली होती. लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद देत 53 विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने संसदेचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली . त्यानुसार काल दिनांक २७ जुलै रोजी 25 विद्यार्थ्यांना संसदेचे प्रत्यक्ष कामकाज पाहता आले तर आज दिनांक 28 जुलै रोजी 28 विद्यार्थ्यांनी या कामकाजाचा अनुभव घेतला. दोन दिवसात ५३ विद्यार्थ्यांना संसदेच्या कामकाजाचा अनुभव घेता आला. त्यामुळे युपीएससी, एमपीएससी तयारी करून आगामी काळात यशस्वी झाल्यानंतर निश्चितपणे हा अनुभव त्यांना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केवळ खा.चिखलीकर यांच्यामुळे आपणास संसदेच्या कामकाजाचा अनुभव घेता आला . लोकसभेत बसून प्रशासकीय कामकाजाची पाहणी करता आली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी खा. चिखलीकर यांच्या आभार मानले आहेत.

Previous articleनांदेड जिल्ह्यात संततधार नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा
Next articleसौ.शांताबाई बाठियां यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.